New District In Maharashtra 2025 : राज्यातील नवीन २१ जिल्हानिर्मितीवर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य, एका वाक्यात विषय संपवला !

New Disttrict In Maharashtra 2025 : महाराष्ट्रात सध्या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात २६ जानेवारी २०२५ रोजी २१ नवीन जिल्ह्यांची (navin jilhe 2025) घोषणा होणार अश्या पोस्ट आणि काही बातम्या सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. राज्यात २६ जानेवारी रोजी खरचं २१ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा होणार का ? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अश्यातच राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुर येथे बोलताना नवीन जिल्हानिर्मितीवर मोठे वक्तव्य केले आहे. (maharashtra new district list 2025)

Revenue Minister Chandrasekhar Bawankule's big statement on creation of new 21 districts in maharashtra, navin jilhe 2025, new district in maharashtra 2025,

राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार का ? याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. याच विषयावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.  राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत, तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असे सांगत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी नवीन जिल्हा निर्मितीच्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले. (new district in maharashtra)

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांचे अस्थापना असा प्रस्ताव सरकारकडे आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात नवीन जिल्हे  निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही. मात्र पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरु आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांचे अस्थापना १०० दिवसांत उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  यामध्ये नागपुर जिल्ह्यातील काटोल, पुणे जिल्ह्य़ातील मावळ आणि बारामती तसेच संभाजीनगर जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु होऊ शकतात, असे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या नवीन जिल्हा निर्मितीच्या बातम्यांवर खुलासा करत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पूर्णविराम दिला.