GBS Virus Pune : पुण्यात जीबीएस आजाराच्या रुग्णांवर संख्येत झपाट्याने वाढ, व्हेंटिलेटरवरील रूग्णांचा आकडा वाचून बसेल धक्का

GBS Virus Pune : गेल्या तीन दिवसांपासून जीबीएस या दुर्मिळ आजाराने पुण्यात मोठी खळबळ माजवली आहे. जीबीएस अर्थात गुइलेन बॅरी सिंड्रोम (gbs virus in pune) या आजाराच्या रूग्णसंख्येत पुण्यात अचानक मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी २२ रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता ही संख्या ५६ वर जाऊन पोहचली आहे. तर राज्यात Guillain Barrie Syndrome या आजाराचे एकुण रूग्ण ५९ झाले आहेत. (gbs outbreak pune maharashtra )

Guillain Barrie Syndrome, GBS Virus Pune, Rapid increase in number of GBS patients in Pune, number of patients on ventilators will shock you, gbs pune cases latest news in marathi

राज्यात जीबीएस (GBS) या दुर्मिळ आजाराने मोठा शिरकाव केला आहे. एकट्या पुण्यात या आजाराचे ५६ रूग्ण रूग्ण आहेत.तर इतर जिल्ह्यात ३ रूग्ण आहेत. पुण्यातील ५६ रुग्णांपैकी १२ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुणेकरांचे धाबे दणाणून गेले आहेत. पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये लहान मुले व तरूणांचा मोठा समावेश आहे.

पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात जीबीएस आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यांची संख्या मोठी आहे. आरोग्य विभागाने या भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून या भागातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहेत.

पुणे शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांनी गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, धायरी आणि आजूबाजूच्या परिसरातील असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सध्या आम्ही पीएमसीच्या अंतर्गत भागातील सहा रुग्णांचे रक्त नमुने गोळा केले आहेत आणि पुढील तपासणीसाठी ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV)कडे पाठवले आहेत, अशी माहिती पीएमसीच्या सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.