- Advertisement -

जामखेड तालुक्यात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा : कोरोनामुळे संविधान मोहत्सवही साधेपणाने साजरा (Republic Day celebrated with great enthusiasm in Jamkhed taluka: Constitution Mohatsav simply celebrated due to corona)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेड तहसिल कार्यालयात तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते तर जामखेड पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. (Republic Day celebrated with great enthusiasm in Jamkhed taluka: Constitution Mohatsav simply celebrated due to corona)

दरवर्षी जामखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा संविधान मोहत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याचबरोबर संविधानालाही अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (Republic Day celebrated with great enthusiasm in Jamkhed taluka: Constitution Mohatsav simply celebrated due to corona)

जामखेड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, खाजगी शाळा, महाविद्यालये  या ठिकाणीही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एकाही शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत.