Ram Shinde News : कर्जत जामखेडचे भाग्यविधाते प्रा. राम शिंदे यांचा शनिवारी नगर येथे होणार सर्वपक्षीय सत्कार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ram Shinde News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते प्रा. राम शिंदे यांचा नगर येथे सर्वपक्षीय सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आदर्शगाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार नीलेश लंके उपस्थित राहणार आहेत.
नगर शहरातील झोपडी कॅण्टिनजवळील माउली सभागृहात येत्या शनिवारी ०४ जानेवारी सकाळी १०.३० वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे, असे या सोहळ्याचे निमंत्रक तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सहनिमंत्रक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, भाजपाचे नेते वसंत लोढा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी कदम, संजय आडोळे यांनी सांगितले. (Ram Shinde News)
यावेळी शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, संग्राम जगताप, रोहित पवार, आशुतोष काळे, किरण लहामटे, सत्यजीत तांबे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, काशीनाथ दाते, अमोल खताळ, हेमंत ओगले हे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे सचिन पारखी, मनसेचे सचिन डफळ, राष्ट्रवादीचे (शरद पवार) अभिषेक कळमकर, उबाठा सेनेचे रावसाहेब खेवरे, रिपाइंचे सुनील साळवे, सेनेचे (शिंदे) बाबुशेठ टायरवाले, भाजपचे दिलीप भालसिंग व नितीन दिनकर, काँग्रेसचे जयंत वाघ, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे, राष्ट्रवादीचे अशोक सावंत आदी संयोजकांनी केले आहे. (Ram Shinde News)