Girase Family Sucied Case Dhule : गिरासे कुटूंब आत्महत्या प्रकरणात समोर आली नवी अपडेट, सुसाइड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी व्यक्त केला वेगळाच संशय, कारण
Girase Family Sucied Case Dhule : धुळे शहरातील प्रमोद नगर भागातील प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रविण गिरासे, दीपा गिरासे, मितेश गिरासे व सोहम गिराशे या गिरासे कुटुंबातील चार सदस्यांनी सामूहिकपणे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.धुळ्यातील गिरासे कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Pravin Girase, Deepa Girase, Mitesh Girase, Soham Girase)
गिरासे कुटूंब आत्महत्या प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. या नंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती एक सुसाइड नोट मिळाली आहे. आम्ही सर्वजण आत्महत्या करत आहोत, आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतू ही सुसाइड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
प्रवीण गिरासे यांनी आपल्या शेजाऱ्यांना मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरासे कुटुंबीय कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरातील चारही मृतदेह कुजायला लागल्यानंतर त्याची थोडीफार दुर्गंधीही पसरली होती.
प्रवीण गिरासे यांची बहीण गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी आली तेव्हा घराचा दरवाजा वरच्यावर लावला होता. तसेच घराच्या आजुबाजूला दुर्गंधी येत होती. तिने दरवाजा उघडला तेव्हा पहिल्या मजल्यावर प्रवीण गिरासे (Girase Family Dhule) यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तर बेडरुममध्ये गिरासे यांची पत्नी दीपा आणि मितेश व सोहमचा मृतदेह होता. या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता
प्रवीण गिरासे व त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रवीण गिरासे यांचे लामकानी, तसेच धुळे शहरात खते बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच नितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते. नितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता.तर दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या.
धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांचे कुटुंब आत्महत्या करूच शकत नाही. त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.