तामिळनाडूत कोरोनाचा उद्रेक,मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केली लाॅकडाऊनची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | देशात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. काही राज्यात रोजच्या रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर येत आहेत. वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन लावला जाणार का ? याबाबत देशात अनेक चर्चा सुरू असतानाच दक्षिण भारतातून (South india) एक मोठी बातमी समोर आली आहे.(Corona eruption in Tamil Nadu, Chief Minister MK Stalin announces lockdown)

देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दर सातत्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर काही राज्यात  परिणाम होऊ लागला आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने सरकारने कठोर पाऊले उचलले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. येत्या 23 जानेवारी रोजी संपुर्ण तामिळनाडू राज्यात लाॅकडाऊन असणार आहे. या घोषणेमुळे पुन्हा तामिळनाडूत खळबळ उडाली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 23 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चेन्नईमध्ये एकूण 6,76,147 कोविड प्रकरणे आहेत.20 जानेवारी रोजी 62,007 सक्रिय संसर्ग सोडून 8,011 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रात कोरोनाचे 40 हजाराहून अधिक रोज रूग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकार व आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करत आहेत. राज्यात सध्या नाईट कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी लागू आहे. परंतू कोरोना रूग्ण संख्येची दरवाढ सुरूच आहे.

राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असली तरी ती कागदावर आहे. नियमांचा बोजवारा उडाल्याचे चित्र राज्यभर आहे. सरसकट कारवाई होताना दिसत नाही. जुजबी कारवाया पार पाडून सोपास्कार पार पाडले जात आहेत.