Mobile Forensic Van Maharashtra Police : महाराष्ट्र पोलिस दलात गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल, अशी सेवा सुरू करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

मुंबई, २७ जानेवारी २०२५ : Mobile Forensic Van Maharashtra Police : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Mobile Forensic Van Maharashtra Police, Mobile Forensic Van entered in Maharashtra Police Force for crime proofing, Mobile Forensic Van service started for crime proof in maharashtra, Maharashtra becam first state in india

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Mobile Forensic Van Maharashtra Police, Mobile Forensic Van entered in Maharashtra Police Force for crime proofing, Mobile Forensic Van service started for crime proof in maharashtra, Maharashtra becam first state in india

मुख्यमंत्री म्हणाले,  राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये  फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

Mobile Forensic Van Maharashtra Police, Mobile Forensic Van entered in Maharashtra Police Force for crime proofing, Mobile Forensic Van service started for crime proof in maharashtra, Maharashtra becam first state in india

कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  प्रधान सचिव राधिका रस्तोगी, प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, महासंचालक (न्याय व तांत्रिक) संजय वर्मा, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय संचालक डॉ. संगीता घुमटकर, उपसचिव राजेंद्र  भालवणे आदींसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.