GBS Outbreak In Pune : ब्रेकिंग न्यूज ! पुणे परिसर जीबीएस आजाराचा हाॅटस्पाॅट बनताच केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल

GBS Outbreak In Pune : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात जीबीएस (pune gbs) आजाराने थैमान घातले आहे. मागील आठ दिवसांपासून जीबीएस आजाराचा (gbs virus latest news pune) मोठा उद्रेक झाला आहे. पुण्यातील जीबीएस रूग्णसंख्या आता १०१ (GBS cases in pune) इतकी झाली आहे. शनिवारी रात्री पुण्यातील एका रूग्णाचा सोलापुरात मृत्यू झालाय, या घटनेनंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जीबीएस आजाराची गांभीर्याने दखल घेत मोठे पाऊल उचलले आहे. (Guillain Barre syndrome pune in marathi)

GBS Outbreak In Pune, Breaking News, As soon as Pune area became hotspot of GBS disease central government took big step, 7-member Central High-level expert team deputed to support Maharashtra in management of Guillain-Barré syndrome cases,

पुण्यात मागील आठवड्यात जीबीएस आजाराचा शिरकाव झाला.अत्यंत दुर्मिळ आजारात गणल्या जाणाऱ्या या आजाराच्या रूग्णांची मोठी संख्या पुण्यात आढळून आल्याने पुणेकरांची झोप उडवून दिली आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील पुण्यात जीबीएस आजाराचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने सात सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती जीबीएस आजार रोखण्यासाठी महाराष्ट्राला सर्वोतोपरी मदत करणार आहे, असे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

भारतात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. विशेषता: पुण्यात या रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे शहर आणि परिसर जीबीएस आजाराचा हाॅटस्पाॅट बनलाय. पुण्यातील रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केलीय. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार नेमका कश्यामुळे होतो ? याविषयी जनतेत अजूनही संभ्रम आहे. दुषित पाणी, शिळे व अस्वच्छ अन्न सह आदी कारणे सांगितली जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारणांचा शोध लागलेला नाही.

पुण्यात रविवारी (२६ रोजी) जीबीएसच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएस रूग्णांची संख्या आता १०१ इतकी झाली. जीबीएस पुण्यात शंभरी पार झाल्याने आता सर्वांचेच धाबे दणाणून गेले आहेत. पुण्यात जीबीएसचे एकुण १०१ रूग्ण आहेत. त्यातील ६२ रूग्ण पुणे ग्रामीण, १९ पुणे महापालिका, १४ पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत. तर इतर ६ रूग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १७ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहिती संकलित केली जात आहे. राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा कदा जीबीएसकडे वळले आहे

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथे मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आला आहे.

पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गिया बर्रे सिंड्रोमवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रुग्णालयामध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आले असून 15 आयसीयू बेडही कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत.

जीबीएसने राज्यातील पहिला बळी घेतला आहे. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी मृत्यू झाला आहे. यामुळे जनतेत मोठी भीती पसरली आहे. जीबीएस आजाराच्या मुळ कारणांचा तातडीने शोध घेऊन या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने वेगवान उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जीबीएस आजाराची लक्षणे-

पायांमध्ये अशक्तपणा शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालींमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे. वेदनेसह खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते. गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. श्वसनास त्रास होणे, हातापायांना झिणझिण्या येणे, रक्तदाबाची समस्या निर्माण होते, चालताना अडचण येणे, चेहऱ्यावर कमजोरी येणे, अतिसार होणे सह आदी लक्षणांचा समावेश आहे.

जीबीएस आजार गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कारण-

ही एक जीवघेणी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.