MLA Rohit Pawar | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोहित पवारांनी घेतली कोकणात धाव !

दिड लाख वस्तू घेऊन पूरग्रस्त भागात दाखल

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या महापुराच्या आपत्तीत या भागातील संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे धावून गेले आहेत. (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar has extended a helping hand to the flood-hit people of Konkan and Western Maharashtra.)

‘कर्जत  -जामखेड’ मतदारसंघातील नागरिक (Citizens of ‘Karjat-Jamkhed’ constituency) आणि ‘बारामती ऍग्रो’ कंपनीच्या (Baramati Agro ‘Company) माध्यमातून पुरग्रस्तांसाठी आवश्यक दिड लाख वस्तू घेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे  पूरग्रस्त भागात दाखल झाले असून त्यांनी मंगळवारी कोकणातील वेगवेगळ्या भागांना भेटी देत मदतीचे वितरण केले. (Distribution of 1.5 lakh items required for flood victims)

संकटग्रस्त भागातील माणसांच्या वेदना समजून घेत मानसिक आधार देण्याचे काम आमदार रोहित पवारांनी हाती घेतले आहे. मंगळवारपासून आमदार रोहित पवार कोकणच्या दौर्यावर आहेत. आज ते पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्या भागातही मदत पोहोच  करणार आहेत . (MLA Rohit Pawar has been on a tour of Konkan since Tuesday. Today, he will inspect the affected areas in western Maharashtra and reach out to those areas.)

MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar inspecting the flood affected areas of Konkan and interacting with the citizens there

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुरग्रस्तांसाठी आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) मदतीचा हात पुढे केला आहे . पुराच्या पाण्यामुळे संसार उध्वस्त झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून चादर, बिस्कीट, सॅनिटरी नॅपकिन्स, पाण्याच्या बॉटल, ORS एनर्जी ड्रिंक, क्लोरीन पावडर, मास्क, मॅगी नूडल्स, माचीस आदी वस्तूंचा समावेश असलेले दिड लाखाहून अधिक साहित्य त्यांनी पोहोच केले. या साहित्याचे गरजू नागरिकांना न्याय्य वाटप व्हावे यासाठी संबंधित ठिकाणचे तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले.

MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar inspecting the flood affected areas of Konkan and interacting with the citizens there

तसेच या संकटात शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते हेही झोकून देऊन अहोरात्र मदतकार्य करत आहेत. काम करताना या सर्वांची ऊर्जा टिकून रहावी याकरिता या सर्व ‘फ्रंटलाईन वर्कर’साठी ORS एनर्जी ड्रिंकचे पॅकेटही उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय मदत व बचावकार्य करत असताना काही अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेट्यांचाही या मदत साहित्यात समावेश करण्यात आला आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले. (MLA Rohit Pawar)