खळबळजनक | पन्हाळकर हाॅस्पीटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील पन्हाळकर हाँस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला होण्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जामखेड शहरातून खळबळजनक घटना समोर आली. बीड रोडवरील पन्हाळकर हाँस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्याबरोबर डाॅ पन्हाळकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात ते पाऊणे आठच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज 1 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास महेश ऊर्फ भैय्या परदेशी याचा अपघात झाल्याने जामखेड येथील पन्हाळकर हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दिपक चव्हाण व आनंद बाळासाहेब मोरे हे दोघे रूग्णासोबत होते.

यावेळी पन्हाळकर हाँस्पिटल येथील आँपरेश थिएटर सहाय्यक विनोद अरूण डोके यांनी दिपक चव्हाण याला X-RAY चे तीनशे रूपये फि भरा व जखमीच्या डोळ्याला मार लागल्यामुळे पेशंटला डोळ्याच्या दवाखाण्यामध्ये घेवुन जा असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने आरोपींनी फिर्यादी डोके व डाॅ पन्हाळकर यांना घाण घाण शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी हाँस्पिटलच्या बाहेर जावुन पाण्याच्या बोअरवेलचे नुकसान करून पाईप तोडुन, प्लंबीगचा पाईप व दगड हातामध्ये घेवुन मारण्यास आले यावेळी आरोपी दिपक चव्हाण हा तेथे असलेल्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांकडे पाहुन म्हणाला की, माझ्या विरूध्द कोणी तक्रार दिली तर, मी जिवे मारून टाकील अशी धमकी दिल्याने हाँस्पिटलमध्ये असलेले पेशंट व त्यांचे नातेवाईक पळुन गेले. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती.

त्यानंतर पुन्हा 07.45 वा च्या सुमारास आरोपी दिपक चव्हाण हा त्याच्या MH-08-AC-9394 या कारमधून लोखंडी राँड घेवुन पुन्हा हाँस्पिटलमध्ये शिवीगाळ करत आला व फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी राँड मारला. फिर्यादीने तो हल्ला हुकविला.पुन्हा आरोपीने फिर्यादीचे डोक्याकडे जोराने मारला परंतु फिर्यादीने तोही हल्ला हुकवला. आणि जीव वाचवण्यासाठी हाँस्पिटलच्या एका रूममध्ये जाऊन फिर्यादी लपून बसला. त्यानंतर डाँक्टर व हाँस्पिटलाचा स्टाफ आल्याने आरोपी दिपक चव्हाण हा म्हणाला की, तु आता वाचलास तु परत भेट तुला गोळ्या घा ठार मारतो अशी धमकी दिली असे जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी सायंकाळी विनोद अरूण डोके वय 28 वर्षे धंदा खाजगी नोकरी (पन्हाळकर हाँस्पिटल, जामखेड मध्ये, आँपरेश थिएटर सहाय्यक ) रा. मातकुळी ता. आष्टी जि. बीड याच्या फिर्यादीवरून जामखेड शहरातील दिपक चव्हाण व आनंद बाळासाहेब मोरे या दोघांविरोधात कलम 307, 323, 504, 506, 427, 34 व महाराष्ट्र वैदयकिय सेवा-व्यक्ती आणि वैदयकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी यांना प्रतिबंध) अधिनीयम 2010 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.