Ketan Agrawal Case: केतनच्या बहिणीने असा केला Siya Goyal चा गेम ओव्हर, हत्येचं बिंग कसं फुटलं? सर्वात मोठी अपडेट

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (ketan Agrawal) हत्याकांड प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय. केतन अग्रवालच्या बहिणीने केलेल्या एका कृतीमुळे सिया गोयलचा (siya Goyal) गेम ओव्हर झाल्याचे समोर आलेय, केतनच्या हत्येचं बिंग कसं फुटलं? जाणून घेऊयात. (Ketan Agrawal Case latest news)

Ketan Agrawal Case, How Ketan's sister put an end to Siya's game, how was the murder exposed? Major update,

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक कुटूंबातील केतन अग्रवाल हा तरूण होणाऱ्या बायकोसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड (Lohgad) किल्ल्यावर गेला होता. तिथे पाय घसरून दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १८ जूनला घडली होती. या अपघाती घटनेने मोठी खळबळ उडाली होती. (Ketan Agrawal Case latest update)

खरं तर, जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा अग्रवाल कुटुंबासह लोणावळा पोलिसांना हा अपघात असल्याचं वाटलं. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू अशी केली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंब दु:खाच्या सागरात होतं. हातातोंडाला आलेला मुलगा त्यांनी गमावला होता. मुलाच्या अपघाती मृत्यूनं हादरलेल्या कुटुंबीयाने कोणतीही तक्रार किंवा संशय न घेता केतनवर अंत्यसंस्कार केले. मात्र अग्रवाल कुटुंबात एक व्यक्ती अशी होती, जिला शांत बसवत नव्हतं. केतनबाबत अनेक प्रश्न तिच्या मनात होते.

…अन् केतनच्या बहिणीचा संशय खरा ठरला

ती व्यक्ती म्हणजे केतनची बहीण. आपल्या भावासोबत लोहगडावर काय घडलं, तो कसा पडला? त्याला वाचवता आलं असता का? असे अनेक प्रश्न केतनच्या बहिणीला पडले होते. केतनवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार दिवसांनी सिया गोयल अग्रवाल कुटुंबाच्या घरी गेली होती. ती केतनच्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेली होती. मात्र हीच संधी केतनच्या बहिणीने साधली. तिने सियाला एका बाजुला घेत, केतनबद्दल आणि लोहगडावर घडलेल्या घटनांबद्दल माहिती विचारली. तिने सियावर प्रश्नांचा भडिमार केला.

यावेळी अनेक प्रश्नांना सियाला उत्तर देता आलं नाही. ती उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं केतनच्या बहिणीच्या लक्षात आलं. यानंतर ही बाब केतनच्या बहिणीने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. ही माहिती ऐकून दु:ख सागरात लोटलेलं अग्रवाल कुटुंब खडबडून जागं झालं. केतनच्या बहिणीने लावलेल्या तर्कात त्यांना तथ्य वाटू लागलं. यानंतर त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांशी चर्चा केली.

संशयाची पाल मनात चुकचुकली अन् सियाचा गेम ओव्हर झाला

यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन कामाला लागलं. त्यांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी एक तरुण ऐन उन्हाळ्यात अंगात हुडी घालून, कानाला हेडफोन लावून आणि स्वत:चा चेहरा लपवत संशयास्पद हालचाली करत असल्याचं लक्षात आलं. इथूनची पोलिसांच्या तपासाची चक्र फिरवली. तेव्हा पोलिसांनी सिया गोयलची कुंडली मिळाली. तिच्या अफेअर्सची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी ताब्यात घेतलं. तेव्हा दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.

सुरुवातीला पोलीसही चुकले होते. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र केतनच्या बहिणीमुळे हा सगळा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिया गोयलसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यात आणखी कुणाचा सहभाग होता का? याचा सविस्तर तपास सध्या पोलीस करत