जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त मंगळवारी चोंडीत अभिवादन सभा – ॲड. चिमणभाऊ डांगे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास राज्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.
श्री क्षेत्र चौंडी येथे मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. यावेळी पार पडणाऱ्या अभिवादन मेळाव्यासाठी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे, माजी आमदार मा. अँड. रामहरी रूपनवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे हे या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे, मल्हार सेना सरसेनापतीबबनराव रानगे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ अलकाताई गोडे, महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनिलभाऊ वाघ, सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा अरुण घोडके, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुशराव निर्मळ सह महासंघाचे प्रदेश पदाधिकारी या पुण्यतिथी समारंभास उपस्थित रहाणार आहेत.
श्री क्षेत्र चौंडी येथे मंगळवारी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी समारंभासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.