Jamkhed Nagar Parishad : जामखेड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार;कारण काय ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Nagar Parishad : भूतवडा तलावावरून (bhutwada talav) जामखेड शहराला होणारा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. शहरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (water supply of Jamkhed city Will be closed for two days)

Jamkhed Nagar Parishad, water supply of Jamkhed city Will be closed for two days, what is the reason?, jamkhed news today live,

पन्नास हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जामखेड शहरातील नागरिकांना भूतवडा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

Republic Day Parade 2025 : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी यंदा होणाऱ्या परेडचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? परेडचे संपूर्ण वेळापत्रक काय? कोण आहेत यंदा प्रमुख पाहुणे ? संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

भूतवडा तलावातून जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या वार्षिक देखभाल दुरूस्तीचे व लिकेजेस दुरूस्तीचे काम नगरपरिषदेकडून हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे येत्या २१ व २२ जानेवारी रोजी जामखेड शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे.

जामखेड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहराला चोवीस तास स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून उजनीवरून जामखेड शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

भूतवडा तलावातून जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारी योजना जुनी झाली आहे. शहराला मुबलक पाणी पुरवण्यास ही योजना तोडकी ठरत आहे. सध्या या योजनेतून आठवड्यातून एक तास पाणी पुरवठा होतो.

उजनी धरण क्षेत्रातून नव्याने होणाऱ्या पाणी योजनेमुळे शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार आहे.