जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम ; दिवसभरात द्विशतक पार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम असुन जामखेड तालुक्यात आज दिवसभरात कोरोनाने उसळी मारत तब्बल 249 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने आज दिवसभरात एकुण 47 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यात 14 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर प्रशासनाला आज 631 RTPCR तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये तब्बल 235 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आज दिवसभरात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड 04,घोडेगाव 04, झिक्री 01,धनेगाव 02, चुंभळी 03, खर्डा 01, सोनेगाव 01 या 14 रूग्णांचा समावेश आहे.

तर RTPCR तपासणी अहवालामध्ये जामखेड शहर 70, आरणगाव 07 डोणगाव 02, कवडगाव 02,पिंपरखेड 03, चौंडी 01, हळगाव 08, बावी 02, भवरवाडी 03, रत्नापुर 02, कुसडगाव 02, सरदवाडी 07,धामणगाव 01, तेलंगशी 03, नायगाव 10, नाहुली 05, बांधखडक 03, पांढरेवाडी 01, बाळगव्हाण 02,घोडेगाव 07, पिंपळगाव उंडा 01, वाघा 01जवळके 03,दिघोळ 03,माळेवाडी 01,खर्डा 01,नागोबाचीवाडी 02, सोनेगाव 04,तरडगाव 01,सातेफळ 05, धनेगाव 04, नान्नज 01,गुरेवाडी 02,महारुळी 06, चोभेवाडी 01, बोरला 01, भुतावडा 04, रेडेवाडी 01, जमदारवाडी 02, साकत 07,कोल्हेवाडी 03,पिंपळवाडी 01, कडभनवाडी 02, राजुरी 11, शिउर 07, पाडळी 04, खुरदैठण 09,
जवळा 04, चुंभळी 02 असे एकुण 235 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली आहे.