Jalgaon Railway Accident Today : ब्रेकिंग जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, आगीच्या भीतीने प्रवाश्यांनी मारल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या, कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं, 10 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी

Jalgaon Railway Accident Today : जळगावमध्ये रेल्वे प्रवाश्यांचा भीषण अपघात झालाय. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (pushpak express) आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी भीतीने धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Bangalore Express) अनेकांना उडवलं.या भीषण दुर्घटनेत (Jalgaon Train Accident) प्राथमिक अंदाजानुसार 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 35 ते 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरची दृश्ये मन हेलावून टाकणारी आहेत. (pushpak express accident today)

Jalgaon Railway Accident Today, passengers killed by fear of fire jumped off Pushpak Express, Many people were blown away Karnataka Express,10 dead and 40 injured, Terrible railway accident in Jalgaon, pardhade Railway Station,

जळगावजवळच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Pardhade Railway Station) उत्तर प्रदेशच्या लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यानं अनेक प्रवाशांनी रुळांवर उडी मारली असता, दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसला धडकून अनेकांचा मृत्यू झाला आहे. (jalgaon Railway accident)

रेल्वे थांबत असताना चाकातून ठिणग्या येताना दिसल्यानं एका डब्यातील काही प्रवाशांनी घाबरून डब्याला आग लागली असल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर घबराट पसरल्यानं डब्यातील अनेकांनी रुळावर उड्या मारण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी बाजूच्या रुळावरून कर्नाटक एक्सप्रेस वेगानं जात असल्यानं अनेक प्रवासी त्याखाली चिरडले गेले.

आतापर्यंत अंदाजे १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.

Jalgaon Railway Accident Today, passengers killed by fear of fire jumped off Pushpak Express, Many people were blown away Karnataka Express,10 dead and 40 injured, Terrible railway accident in Jalgaon, pardhade Railway Station,