IAS Transfer Maharashtra Today : राज्यातील 8 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, S. Naveen Sona यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती !

IAS Transfer Maharashtra Today : महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय कारभार गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठे फेरबदल हाती घेतले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. मागील आठवड्यात १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखीन आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एस नवीन सोना यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

IAS Transfer Maharashtra Today, 8 IAS officers transferred in Maharashtra, S Naveen Sona appointed as Principal Secretary to Deputy Chief Minister Eknath Shinde

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. श्री अतुल पाटणे (IAS:RR:1999) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. श्रीमती ऋचा बागला (IAS:RR:1999) यांना प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

3. श्रीमती अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्री एन.नवीन सोना (IAS:RR:2000) प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (ADF) कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. श्री वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. श्री प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. श्री माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Transfer List : या आधी कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. मिलिंद म्हैसकर (IAS:RR:1992) अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. बी. वेणुगोपाल रेड्डी (IAS:RR:1994) अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:1995) प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. I.A.कुंदन (IAS:RR:1996) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. विनिता वैद सिंगल (IAS:RR:1996) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. डॉ.हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. डॉ. निपुण विनायक (IAS:RR:2001) प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

8. जयश्री भोज (IAS:RR:2003) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

9. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री.एच.एस.सोनवणे (IAS:SCS:2010) यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.

11. श्री संतोष पाटील (IAS:SCS:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्री जितेंद्र दुडी (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.