Ram Shinde : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे (Ram Shinde) हे सहकुटुंब राजधानी दिल्लीच्या दौर्यावर आहेत.प्रा शिंदे यांनी बुधवारी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President of india Jagdeep Dhankhad) यांची त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल धनखड यांनी प्रा राम शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले. तसेच शिंदे कुटूंबातील प्रत्येक सदस्याशी धनखड यांनी अतिशय आपुलकीने संवाद साधला.
विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली होती.आज बुधवारी शिंदे हे सहकुटुंब उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शिंदे कुटुंबाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांच्याशी धनखड कुटूंबाने अतिशय आपुलकीने संवाद साधला.या भेटीवेळी प्रा राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे, मुलगी डाॅ अन्विता शिंदे, मुलगी डॉ अक्षता शिंदे, जावाई श्रीकांत खांडेकर (ias), मुलगा अजिंक्य शिंदे हे शिंदे कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. या सदिच्छा भेटीत धनखड कुटुंबाने शिंदे कुटूंबातील सर्वांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रा शिंदे यांचा सन्मान केला. दरम्यान प्रा राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा सत्कार केला.
दरम्यान, या भेटीबाबत प्रा राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहीली आहे, त्यात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड जी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय अनुभवातून या भेटीत खूप काही शिकण्यासारखे होते.देशाच्या संस्कृतीशी त्यांचा खोलवर संबंध आहे. तर त्यांच्या प्रदीर्घ अनुभवात पर्यटन क्षेत्राचा खास समावेश आहे. अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.