IAS Transfer Maharashtra 2025 Today : महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सातारा आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांची बदली तर मंत्रालयात मोठे फेरबदल !

IAS Transfer Maharashtra 2025 Today : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट सुरु झाली आहे. राज्याचा प्रशासकीय कारभार गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धडाका लावला आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी काही प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

Maharashtra IAS Transfer, Transfer of 12 IAS officers in Maharashtra, IAS Transfer Maharashtra 2025 Today, Transfer of 12 senior IAS officers in Maharashtra, transfer of Satara and Pune District Collectors and major reshuffle in the Ministry,

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार खालील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. IAS Transfer Maharashtra 2025 Today

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे सध्याचे जिल्हाधिकारी डाॅ सुहास दिवसे यांच्या जागी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ सुहास दिवसे यांची प्रमोशनवर बदली करण्यात आली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालकपदी डाॅ सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. IAS Transfer Maharashtra 2025 Today

जितेंद्र हुडी यांच्या जागी सातारा जिल्हाधिकारी म्हणून संतोष पाटील यांची बदली करण्यात आली आहे. संतोष पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत होते. ते आता साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

महसुल वन विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ निपुन विनायक यांची आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावर बदली करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची कृषि व पदुम प्रधान सचिव पदावर बदली करण्यात आली आहे. IAS Transfer Maharashtra 2025 Today

वेणुगोपाल रेड्डी हे उच्च व तंत्रशिक्षण तसेच वन विभागाच्या प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. क्रिडा व युवक सेवा आयुक्त पदावर एच एस सोनवणे यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव म्हणून आय. ए. कुंदन यांची बदली करण्यात आली आहे. IAS Transfer Maharashtra 2025 Today

अर्जित सिंह देवल यांची शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव म्हणून विनिता वैद सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयश्री भोज यांची अन्न आणि धान्य पुरवठा विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. IAS Transfer Maharashtra 2025 Today

IAS Transfer Maharashtra 2025 Today : महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मिलिंद म्हैसकर (IAS:RR:1992) अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. बी. वेणुगोपाल रेड्डी (IAS:RR:1994) अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:1995) प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. I.A.कुंदन (IAS:RR:1996) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. विनिता वैद सिंगल (IAS:RR:1996) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. डॉ.हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. डॉ. निपुण विनायक (IAS:RR:2001) प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

8. जयश्री भोज (IAS:RR:2003) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

9. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री.एच.एस.सोनवणे (IAS:SCS:2010) यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.

11. श्री संतोष पाटील (IAS:SCS:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्री जितेंद्र दुडी (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे