heavy-rains mumbai | मुसळधार पावसाने मुंबईत घेतले २५ बळी !

रात्रभर मुसळधार पावसाने मुंबईला काढलं अक्षरक्ष: झोडपून

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. (heavy-rains mumbai) चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून १७  जणांचा मृत्यू झाला आहे.इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भांडूपमध्येही भिंत कोसळून १६  वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाने मुंबईची पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे.

मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे (heavy-rains mumbai) मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे (heavy-rains mumbai) अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली.कांदिवली पूर्व भागात हनुमान नगर भागात पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये घुसलं आहे. सायन, किंग्जसर्कल, लालबाग, प्रभादेवी या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

 

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चेंबूर भागात घराची भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. वाशी नाका, न्यू भारत नगर माहुल इथे ही दुर्घटना घडली.रात्री एकच्या सुमारास हा दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे झाड  भिंतीवर कोसळलं आणि भिंत पडली. राजावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.(heavy-rains mumbai)

विक्रोळी इथे पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीनजणांचा मृत्यू झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. विक्रोळी मधल्या सूर्या नगर, पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रात्री पावणेतीनच्या सुमारास सतत पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.(heavy-rains mumbai)

Update – मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ०५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी जाहीर केले आहे. आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली असताना चेंबूर दुर्घटनाग्रस्तांना ०५ लाखांची मदत आणि जखमींचा खर्च सरकार करणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.(heavy-rains mumbai)

Update - मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येथील दुर्घटनेतील लोकांना मदतही जाहीर केली आहे.(heavy-rains mumbai)

 

 

 

सुचना : ही बातमी आम्ही सतत अपडेट करत आहोत, या बातमी संबंधि नवी माहिती जशी समोर येईल तशी ती या ठिकाणी अपडेट केली जाईल. कृपया पेज सतत रिफ्रेश करत रहा.