Corona Century | दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्याने तालुक्यात उडाली मोठी खळबळ

कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच कोरोना झाला सुसाट

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच जामखेड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.शनिवारीही कोरोना सुसाट झाला आहे.Corona century in two days caused a stir in the taluka

जामखेड तालुक्याला कोरोनाने मागील दोन दिवसांत सर्वात मोठा दणका दिला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८७ रूग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विध्वंस सुरू तर झाला नाही ना या चिंतेने आता जनतेला ग्रासले आहे. Corona century in two days caused a stir in the taluka

आज शनिवारी आरोग्य विभागाने ६९८ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यां केल्या त्यामध्ये जामखेड ०४, वाघा ०४, भुतवडा ०२, नान्नज ०१‌ , बोरला ०१, धोतरी ०१, तेलंगशी ०१, फक्राबाद ०४ असे तर RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०१ असे एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आज आरोग्य विभागाने ४५२ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने जिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली. Corona century in two days caused a stir in the taluka

शुक्रवारी दिवसभरात ६०४ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जामखेड ०५, वाघा ०२, राजुरी ०१, भुतवडा ०३, धोतरी ०३, घोडेगाव ०२ असे १६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड २०, तेलंगशी २८, दौंडवाडी ०१, बांधखडक ०१, भुतवडा ०१, बोरला ०४, डिसलेवाडी ०१, हापटेवाडी ०१, जमदारवाडी ०२, खर्डा ०१, कुसडगाव ०१, महारूळी ०१, साकत ०१, शिऊर ०३, सोनेगाव ०१, सावरगाव ०१, पिंपरखेड ०२, रत्नापुर ०१ असे एकुण ८७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर ४५७ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. Corona century in two days caused a stir in the taluka

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. बैठकांचा फार्स रोजच होत आहे. नियम ठरवून दिले खरे पण ते नियम नेमके कुणासाठी ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शासकीय नियम गोरगरिबांच्या मुळावर उठले आहेत.बडे लोक मात्र नियमांना पायदळी तुडवत आहेत. शहरासह तालुक्यात हीच परिस्थिती आहे. नागरिकांनी कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होऊ नये यासाठी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे. अन्यथा दुसर्‍या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा विध्वंस विनाशकारी ठरू शकतो हे मात्र निश्चित. Corona century in two days caused a stir in the taluka