धक्कादायक: सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू (Five workers die in fire at Siram Institute)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात आली असून, या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक हाती आली आहे. (Five workers die in fire at Siram Institute) पाचही मृतदेह नोबल रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांचे नाव माहीत नाही, अशी माहिती नोबल चे संचालक डॉ. एच के साळे यांनी दिली.

गुरूवारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मांजरी येथील प्लांटमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. सीरम इन्स्टिट्युटमधील आर -बीसीजी’ लस निर्मिती करणार्‍या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या कोवीशील्ड’ लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्यकार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी चार वाजून 34 मिनिटांनी एक ट्टिट करुन आगीविषयी माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी आगीच्या दुर्घटनेत कोणतही जिवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे. परंतु सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.