Maratha reservation : छत्रपती संभाजीराजे येणार रयतेच्या भेटीला; 02 जुलैला जामखेडमध्ये धडकणार ‘जनसंवाद यात्रा’
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) नाकारल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा भलताच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Raje) आक्रमक भूमिकेत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी अंदोलनाची हाक दिली. परंतु कोरोनामुळे हे अंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र राज्यातील मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज राज्याच्या दौर्यावर निघाले आहेत. येत्या दोन जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जनसंवाद यात्रा जामखेडमध्ये धडकणार आहे. (Chhatrapati Sambhaji Raje will hold a dialogue with the people of Jamkhed on July 2 on the issue of Maratha reservation)
छत्रपती संभाजी महाराज जामखेडकर जनतेच्या भेटीसाठी येणार असल्याने मंगळवारी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची जामखेडच्या शासकीय विश्रामगृहात नियोजन बैठक पार पडली.जामखेड भेटीत छत्रपती संभाजी महाराज हे रयतेशी मराठा आरक्षणाची सद्यस्थिती, सारथी संस्थेची सद्यस्थिती, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना यासह आदी विषयांवर संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जामखेड बाजारतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे. दि 02 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती संभाजीराजे जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव व बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रघुनाथ चित्रे यांनी केले आहे. (Jana Samvad Yatra’ to hit Jamkhed on July 2)
यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, बबन (काका) काशिद, शहाजी राजेभोसले, प्रा लक्ष्मण ढेपे, अवधूत पवार, विकास राळेभात, प्रदीप टापरे, शरद शिंदे, मंगेश आजबे, गुलाब जांभळे, शहाजी डोके, संतोष खैरे, बापूसाहेब शिंदे, हवा सरनोबत, अविनाश बोधले, किरण रेडे, दत्ता भाकरे, शुभम कोहकडे, सुनील उबाळे, राम निकम सह आदी मान्यवर उपस्थित होते.