Chakan Shikrapur Road Accident Today : चाकण शिक्रापूर रोडवर सुसाट कंटेनरचा थरकाप उडवणारा थरार, भरधाव कंटनेरने 10 ते 15 जणांना उडवले, भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी !

chakan shikrapur road accident today :  पुण्यातील चाकण – शिक्रापूर हायवेवर गुरुवारी मोठा अपघात झाला.एका सुसाट कंटनेरने अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत भरधाव कंटनेरने १० ते १५ जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने सुसाट कंटनेरला रोखण्यात यश मिळवले. यावेळी जमावाने चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. (chakan shikrapur highway accident news today)

chakan shikrapur road accident today, breking news, 10 to 15 people were blown up by speeding container on Chakan Shikrapur road, the thrill of the shaking container, one person died and many others were injured in terrible accident,

याबाबत सविस्तर असे की, चाकणहून शिक्रापूरच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. भरधाव असलेल्या या कंटनेरने रस्त्यात येणाऱ्या वाहनांना धडक देत तो पुढे शिक्रापूरच्या दिशेने चालला होता. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनर अडवण्यासाठी त्याचा पाठलाग सुरु केला. परंतु पाठलाग करतानाचा हा थरार काही वाहनधारकांनी कॅमेरात कैद केला. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

असा सुरु झाला सुसाट कंटनेरचा थरार

चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले.मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगाने शिक्रापूरच्या दिशेने निघाला.पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले.या थरारक घटनेचे व्हिडीओ सुद्धा समोर येत आहेत. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिलाय. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे.

chakan shikrapur road accident today, breking news, 10 to 15 people were blown up by speeding container on Chakan Shikrapur road, the thrill of the shaking container, one person died and many others were injured in terrible accident,

मुलीचा पाय शरीरावेगळा

शेलपिंपळगाव येथे या गाडीने एक मोठा ट्रक व कारला उडवले. यात दुसऱ्या ट्रक खाली कार घुसली. या कंटेनरने चाकण येथे एका मुलीला धडक दिली. त्यात तिचा पाय शरीरापासून वेगळा झाला. सुमारे 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

chakan shikrapur road accident today, breking news, 10 to 15 people were blown up by speeding container on Chakan Shikrapur road, the thrill of the shaking container, one person died and many others were injured in terrible accident,

दरम्यान, महामार्गावर अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर हा कंटनेर थांबला. त्यानंतर मोठा जमाव जमा झाला. या जमावाने कंटनेर चालकाला चांगलाच चोप दिला. अनेक जण अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.