Rajshri Munde Car Accident : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडेंच्या कारला अपघात । Dhananjay Munde wife car accident

Rajashri Munde Car Accident : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे (rajashree munde) यांच्या कारला आज पहाटे अपघात झाला. कार आणि ट्रॅव्हलमध्ये हा अपघात झाला. ही घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात घडली. (Dhananjay Munde wife car accident)

Rajshri Munde car accident, Agriculture Minister Dhananjay Munde wife Rajshri Munde car accident, pune solapur highway accident today

कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे ह्या पुण्याहून बीडला निघाल्या होत्या.पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात त्यांच्या कारने खाजगी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात राजश्री मोरे थोडक्यात बचावल्या, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.राजश्री मुंडे यांच्या कारला आज पहाटे साडेचार च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत, राजश्री मुंडे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्या दुसर्‍या खाजगी वाहनाने बीडला रवाना झाल्या आहेत. अशी प्राथमिक माहिती आहे.