Big news | आरोग्य विभागाची 25,26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द !

मुंबई:  Big news | सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परिक्षा रद्द संबंधीची माहिती आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून करण्यात येणार्‍या मेगाभरतीसाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) रोजी लेखी परीक्षा होणार होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

हॉल तिकीट मिळवण्यात निर्माण झालेल्या गोंधळानंतर उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यानुसार आरोग्य विभागाकडून एसएमएस, इमेल द्वारे काळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही तास आधी परीक्षा रद्द झाल्याने मोठा मनस्ताप झाला आहे.

web tital : Big news Health department exam to be held on September 25, 26 canceled – Rajesh Tope