Kapus bajarbhav | कापसाचा 50 वर्षांतील विक्रम : यंदा पांढर्‍या सोन्याला मिळतोय सर्वाधिक दर , शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Agriculture News Today | Kapus Bajarbhav । पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाने मागील 50 वर्षातील विक्रम मोडीत काढले आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत (Akot Market Committee) कापसाला 10 हजार 555 रुपये दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Cotton record of 50 years, White gold is getting the highest price this year, farmers are happy )

मध्यंतरी कापसाच्या दरात घसरण झाली होती माञ आता पुन्हा पांढरं सोनं अकरा हजारांवर जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे.

आधी अतिवृष्टी आणि आता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सध्या कापूस वेचणीचे काम वेगाने सुरू असून, मजूर मिळत नसल्याने अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे.

यंदा कापसाचे वेचणीचे दर प्रति किलो 10 रुपयांवर पोहोचले आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. यावर्षी सर्वच उत्पादनाला हमीभाव पेक्षा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पांढऱ्या सोन्याला तब्बल पन्नास वर्षानंतर झळाळी आल्याने शेतकरी आनंदात आहे. येत्या काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.