कर्जत तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | दि ७ जाने | पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांच्या निर्भीड, निःपक्षपाती लेखणीमुळे अन्यायाला वाचा फुटते. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळतो. यासह चुकीच्या गोष्टीना पायबंद घालण्याची भूमिका पत्रकार निभावत असतो असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.

कर्जत शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वानी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत सन्मान केला.

६ जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी कर्जत शहर आणि तालुक्यातील शासकीय विभाग, विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था यासह राजकीय पक्षांनी शहर आणि तालुक्यातील पत्रकारांना शुभेच्छा देत सन्मान केला.

आ रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि सृजनमार्फत बारामतीच्या ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार, लक्ष्मण शितोळे. माजीमंत्री प्रा राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान मोर्चाचे सुनील यादव. सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने तालुका प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे यांच्यासह मराठा सैनिक. कर्जत पोलीस विभागाच्यावतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, महसुल विभागाच्यावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे, नगरपंचायत विभागाच्यावतीने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पत्रकारांचा सन्मान केला.

तसेच कर्जत डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख. दादा पाटील महाविद्यालयाच्यावतीने नुतन प्राचार्य डॉ संजय नगरकर, समर्थ विद्यालयात संस्थापक प्रमुख तथा नगराध्यक्ष नामदेव राऊत, पै प्रवीण दादा घुले पाटील मित्रमंडळाच्यावतीने प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले. पारनेर सैनिक बँक शाखा कर्जत आणि जामखेडचे शाखाधिकारी धनंजय शेळके व सदाशिव फरांदे. रेणुकामाता पतसंस्थाचे शाखाधिकारी गजानन वाघ. रिलायबल ऍग्रोचे पप्पूशेठ धोदाड आणि भाऊसाहेब धोदाड. समृद्ध कर्जतच्या वतीने संपादक भाऊसाहेब तोरडमल. प्रभातनगर उपनगरवासीय यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते सुभाष माळवे, प्रेस क्लबचे किरण जगताप, पदवीधर पत्रकार संघाचे दत्ता उकिरडे यांच्यासह सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.

पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्कार

कर्जत शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, आ रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि सृजनमार्फत बारामतीच्या ऍग्रोच्या विश्वस्त मातोश्री सुनंदाताई पवार आणि पारनेर सैनिक बँक शाखा कर्जत यांच्यावतीने पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्कार केला. या आगळ्या – वेगळ्या सत्काराने पत्रकारांसह त्यांचे कुटुंब देखील भारावून गेले. यावेळी सुनंदाताई पवार यांनी पत्रकाराच्या कुटुंबियाशी विविध सकारात्मक बाबीवर चर्चा करत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या