राम शिंदेंची जादूची कांडी फिरताच जामखेड राष्ट्रवादीत राजकीय भूकंप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, अरणगावात मोठा राजकीय भूकंप !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष तीव्र बनला आहे. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला हाबाडा देण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपा आमदार प्रा राम शिंदे यांच्या जादूची कांडी आता मतदारसंघात फिरू लागली आहे. याचा पहिला परिणाम जामखेड तालुक्यातून समोर आला आहे.भाजपने राष्ट्रवादीला दे धक्का देत अरणगावात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या अरणगावात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. अरणगाव – पारेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य ॲड संजय बाबुराव पारे, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ डमाळे, लिंबू व्यापारी गोवर्धन राऊत, राजेंद्र निगुडे या चौघांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गुरूवारी रात्री राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा कर्जत तालुक्यातील कापरेवाडीत पार पडला.
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात भाजपा कमालीची सक्रीय झाल्याची दिसत आहे. आमदार राम शिंदे हे आक्रमक मूडमध्ये आहेत. दोन्ही तालुक्यातील त्यांच्या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गावोगावी राष्ट्रवादीला कमजोर करण्यासाठी भाजपने मेगाभरती हाती घेतली आहे. नव्या ताकदवान कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचे धोरण वेगाने राबवले जात आहे. आमदार राम शिंदे यांची जादूची कांडी पुन्हा एकदा मतदारसंघात फिरू लागल्याचेच दिसत आहे.
भाजपने आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या मेगाभरतीच्या मोहिमेला जामखेड तालुक्यात मोठे यश आले आहे.जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील चौघा मातब्बर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्याने अरणगावात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या राजकीय भूकंपाचे थेट परिणाम आता अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये उमटताना दिसणार आहेत.
ग्रामपंचायत सदस्य ॲड संजय बाबुराव पारे, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ डमाळे, लिंबू व्यापारी गोवर्धन राऊत, राजेंद्र निगुडे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अरणगाव ग्रामपंचायतच्या राजकारणात आमदार राम शिंदे यांचा गट मजबूत झाला आहे. आता शिंदे गटाकडील सदस्य संख्या 7 झाली आहे. एकुणच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. अरणगाव सारख्या मोठ्या गावातील दोन ग्रामपंचायत सदस्य आणि इतर दोन महत्वाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतून भाजपात जाणे हा राष्ट्रवादीसाठी खूप मोठा धक्का तर आहेच याशिवाय अगामी काळासाठी ही मोठी धोक्याची घंटा तर नाही ना ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत कापरेवाडी येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी जिल्हा सरचिटणीस सचिन पोठरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अशोक खेडकर, बापूराव ढवळे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे गणेश क्षिरसागर, तात्या माने, उद्योगपती अमोल शिंदे, भाजपा सरचिटणीस लहु शिंदे, गोवर्धन राऊत, अतुल पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष नन्नवरे, सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पासाहेब राऊत, सदस्य डॉ सिताराम ससाणे रमजान शेख, राजेंद्र निगुडे, सचिन राऊत, निखिल पंडित, प्रवीण नन्नवरे, रामा शिंदे, जालिंदर पारे रावसाहेब पारे, कालिदास पारे, चेअरमन अशोक महारनवर सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.