विद्यार्थीनींनो, भरोसा पेटीचा वापर करा, तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

सत्तार शेख www.jamkhedtimes.com

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विद्यार्थीनींनो गावात,समाजात, रस्त्याने,शाळेत तुम्हाला काही त्रास होत असल्यास त्याची माहिती शाळेतील भरोसा पेटीत टाका किंवा 1091 आणि 100 नंबरचा वापर करा असे अवाहन करत तुमच्या सुरक्षेसाठी जामखेड पोलिस दल सदैव दक्ष आहे, तुमच्याकडे कोणीही वाकडे नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही, बिनधास्तपणे तक्रार करा असे प्रतिपादन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले.

जामखेड पोलिस स्टेशन व सतरा महाराष्ट्र एनसीसी बटालियन अहमदनगर वतीने पोलीस रेझिंग डे निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये शस्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते.

जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस हेड काँस्टेबल रमेश फुलमाळी यांनी एस. एल. आर, रायफल, कार्बाइन मशीन गन, आश्रू गॅस ,9 एम एम  पिस्टल, ग्रीनेड यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, एसीसी केडेट यांनी शास्त्रांची हाताळणी केली. रेटिंग डे निमित्त शस्त्र प्रशिक्षण मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी पुढे बोलताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, सोशल मीडियाद्वारे अनेकांची फसवणूक होत आहे. सोशल मिडीयावर वापर जपून करावा. शालेय जीवनात मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा व वाचन संस्कृती जपावी. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे. ज्ञान वाढवावे. एनसीसीचे एकता व अनुशासन कौतुकास्पद आहे.

सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, मुलींनी व महिलांनी आम्हाला आपला मोठा भाऊ समजावे, आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे,मनावर नियंत्रण असल्यावर चुकीचे कृत्य घडत नाही असे सांगत गायकवाड पुढे म्हणाले, विद्यार्थ्यानी वाईट व्यसनापासून दूर राहावे तसेच वाईट ग्रुपच्या संगतीत न जाता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून देशाच्या सेवेत यावे. देशहिताचे कार्य करावे.

विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या मार्गदर्शनासाठी आम्ही मार्गदर्शन करू, विद्यार्थीनींनी सुरक्षितेसाठी 10 91 तसेच 100 नंबर डायल करून आम्हाला माहिती कळवावी किंवा भरोसा पेटीचा उपयोग असे अवाहन यावेळी गायकवाड यांनी केले.

दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी माहिती फलक व संपर्क नंबर याचे फलक नागेश व कन्या विद्यालयात लावण्यात आले तसेच भरोसा पेटी बसवण्यात आली.सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर श्री  नागेश विद्यालय युनिटचे’ ए ‘ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.

यावेळी नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी, उपप्राचार्य तांबे पी एन, पर्यवेक्षक साळवे डी एन, प्रकाश सोनवणे, प्रा रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयुर भोसले, पो. हे. कॉ .भगवान पालवे, पो हे कॉ .रमेश फुळमाळी, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव, विजय धुमाळ, एनसीसी छात्र व नागेश व कन्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.