French astrologer Nostradamus | नेस्त्रोदेमसच्या भविष्यवाणीत दडलयं काय ? 2022 सालात जगात काय होणार ? चला तर मग जाणून घेऊयात 

जगात तिसरे महायुद्ध होणार ?

फ्रान्स : French astrologer Nostradamus । जगभरात भविष्याविषयी कुतूहल आहे.भविष्यात काय होणार ? याचा शोध जगभरातील माणसे कोणत्या ना कोणत्या माध्यमांतून घेताना दिसतात. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. जग आधुनिक झाले आहे. परंतू जगातील माणसे आजही ज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्नात आहेत.

जगाच्या पाठीवर अनेक ज्योतिषी होऊन गेले आहेत. यातील सर्वाधिक चर्चेचे नाव ठरले आहे ते मायकल दि नेस्त्रोदेमस (French astrologer Nostradamus) या भविष्यकाराचे. फ्रान्समधील प्रख्यात ज्योतिषी मायकल दि नेस्त्रोदेमस यांनी सुमारे 350 वर्षापूर्वी केलेल्या अनेक भविष्यावाणी आतापर्यंत तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी प्रत्येक वर्षांसाठी केलेल्या भविष्यवाणीही सत्यात उतरत आहेत असा जगभर समज आहे.

त्यामुळे आगामी वर्षासाठी त्यांनी काय भविष्यवाणी केली आहे, याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. त्यांच्या भविष्यवाणीचे पहिले पुस्तक 1555 मध्ये आले होते. त्यात त्यांनी एकूण 6338 भाकीते वर्तवली आहेत. त्यातील बहुतांश भाकीते खरी ठरली आहेत. 2021मध्ये त्यांनी महामारी, दुष्काळ आणि विनाशकाळ याबाबत भविष्यावाणी केली होती. ती कोरोना व्हायरसमुळे खरी ठरली आहे.

त्यामुळे 2022 बाबत नेस्त्रोदेमस यांनी काय भविष्यवाणी केली आहे, ते जाणून घेऊया…

नेस्त्रोदेमस यांनी काही शतकांपूर्वी ‘लेस प्रोफेटीस’ नावाचे पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी अनेक भाकीते वर्तवली आहेत. त्यातील 70 टक्के भाकीते दरवर्षी खरी ठरतात. 2022 या वर्षात जगाला महागाईचा सामना करावा लागणार आहे. महागाई नियंत्रणाबाहेर वाढण्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन डॉलरचे मूल्य घरसणार असून त्याचा जागतिक अर्थंव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. आगामी वर्षात सोने-चांदी आणि तत्सम वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुतंवणूक होण्याचे भाकीतही नेस्त्रोदेमस यांनी व्यक्त केले आहे.

2022 या वर्षात पृथ्वीला एका लघुग्रहाकडून विनाशकारी धोका आहे. हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याने तो पृथ्वीला धडकल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या लघुग्रहावरील मोठा पर्वत समुद्रात पडणार असून त्यामुळे जगभरात मोठ्या लाटा उसळतील. त्यामुळे अनेक देशांनी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे पृथ्वीवर मोठा विनाश होण्याचे भयावह भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

या वर्षात विनाशकारी अणुबॉम्बचा स्फोट होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. या विस्फोटामुळे ग्लोबल वार्मिंग आणि वातावरणात मोठे बदल होणार असून पृथ्वीवर मोठे बदल घडतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. त्याचप्रमाणे 2022 मध्ये अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे जगभरात तीन दिवस अंधाराचे साम्राज्य असेल. या काळात काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होणार आहे.

2022 या वर्षात फ्रान्सला मोठ्या वादळाचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे जगभरात काही जंगलात वणवा भडकणे, दुष्काळ किंवा महापूर अशी नैसर्गिक संकटे येणार आहेत. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात महागाई वाढून ती नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळे काही देशात भूकबळीसारख्या समस्या निर्माण होतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही मानवाला धोका आहे. या वर्षापासून रोबोट मानवांवर ताबा मिळवण्यास सुरुवात करतील असा धोक्याचा इशारा देणारे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.तसेच भूमध्ये समुद्रात क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान मोठा स्फोट होण्याचे भाकीतही वर्तवण्यात आले आहे.

या विनाशकारी आणि भयावह भविष्यावाणीसोबत त्यांनी सुखद भविष्यावाणीही केली आहे. या विनाशकारी घटनानंतर आणि तीन दिवस जगात अंधार पसरल्यानंतर जगात शांतता प्रस्थापित होईल. अनेक देशात नैसर्गिक घटनांमुळे युद्धसमाप्तीही होईल. या घटना जगाला शांततेकडे नेतील, असे महत्त्वाचे भाकीत त्यांनी केले आहे. तसेच यामुळे जगाला गरज नसलेल्या आधुनिकतेचा अंत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.