Suraj Chavan New Home News: ना प्रसिद्धीचा माज, ना लोकप्रियतेचा गर्व, ह्रदयस्पर्शी कृतीतून सुरज चव्हाण याने जिंकली लाखो चाहत्यांची मने, महाराष्ट्रात एकच चर्चा.. बिग बॉस घर बांधत आहेत..!
Suraj Chavan New Home News : सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनचा विजेता ठरला. गरिब कुटुंबात जन्मलेल्या सुरज चव्हाणने (suraj chavan) सोशल मीडियाच्या माध्यमांतून राज्यात लाखोंचा चाहता वर्ग निर्माण केलाय.बिग बॉसमुळे (bigg Boss 5) त्यात अधिकच भर पडली. सुरज नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला सुरज चव्हाणच्या एका ह्रदयस्पर्शी कृती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. सुरजने केलेल्या या कृतीचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा भावूक व्हिडीओ पाहून लाखो लोक त्याचे अभिनंदन आणि कौतुक करताना दिसत आहेत. जाणून घेऊयात त्याच्या या व्हिडीओ विषयी ! (suraj chavan new home)
काही दिवसांपूर्वी सुरज चव्हाण हा बिग बाॅस मराठी सिजन ५ चा विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेला सुरज हा अत्यंत साधेपणाच्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा सुरज नेहमी स्वता:च्या आयुष्यात घडणार्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरजने त्याच्या नवीन घराच्या (suraj chavan new home) कामाविषयीचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरज हा बांधकाम कामगारांसमवेत स्वता: काम करताना दिसत आहे. पुर्ण झालेल्या बांधकामावर पाणी मारणे असो की गवंड्याला सिमेंट पाटी देणे, बांधकामासाठी लागणारा सिमेंट आणि वाळू कालवणे अशी कामे करताना तो दिसत आहे.
सुरज चव्हाणने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो निळा शर्ट आणि काळ्या रंगाच्या जिन्समध्ये दिसतोय. व्हिडीओमध्ये त्याच्या घराचे बांधकाम चालू असल्याचे दिसत आहे. ज्यात त्याच्या घराचं काम कुठपर्यंत आलंय हे दिसतंय. त्याच्या नवी घराचा पाया घालून झालाय. आणि अर्ध्या भिंतीही उभ्या करून झाल्यात. चार ते पाच कामगार एकत्र मिळून हे काम करत आहेत. पण याच घराच्या बांधकामात खुद्द सुरज चव्हाण सामान्य कामगाराप्रमाणे काम करताना दिसतोय. तो टोपली उचलून ते कामगारांना देतोय. तसेच नव्याने उभ्या राहीलेल्या भिंतींना तो पाणी देताना दिसतोय. घराच्या कामासाठी सुरज मदत करताना दिसतोय. (suraj chavan new home)
विशेष म्हणजे त्याने माझं घर असं कॅप्शन देत लवकरच बिग बॉसचा बंगला उभा राहील, असं समर्पक कॅप्शनही दिलंय. त्याच्या या व्हिडीओला अवघ्या काही तासाच्या आत लाखोच्या घरात लाईक्स आल्या आहेत. सोबतच त्याच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. कसलाच गर्व नाही, स्वतःच्या मातीसाठी स्वतः मेहनत करणारा म्हणजे सुरज दादा, ज्याला कष्टाची लाज नाही तो व्यक्ति आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही, असंच साधेपण कधीच सोडू नको हीच तुझी ओळख आहे, जिथे तू खूप स्वप्न पाहिलीत त्या जागी तुझा बंगला उभा राहतोय खूप छान वाटत आहे सुरज, शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा सूरज दादा, हे दिवस बघायला सूरज च आई वडील असायला पाहिजे होते, असं लिहीत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय. (suraj chavan new home)
दरम्यान, बिग बॉस विजेतेपदाची कसलीच हवा डोक्यात जाऊ न देता, कसलाही गर्व अथवा माज न करता सुरज चव्हाण हा आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वता: मैदानात उतरून काम करताना दिसतोय, प्रसिद्धीच्या झोतात असूनही सुरजने दाखवलेला साधेपणा सुरजच्या लाखो चाहत्यांना भावूक करणारा ठरला आहे. सुरजने केलेली ही कृती चमकोगिरी करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे. स्वता:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सुरज हा बांधकाम कामगारांसमवेत राबवताना पाहून लाखो लोकांच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडतेय ते म्हणजे हाच आहे जमीनीवर पाय असलेला अस्सल मातीतला खराखुरा बिग बॉस! (suraj Chavan New Home)
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता होताच त्याने मिळालेल्या पैशांतून घर बांधणार असल्याचं सांगितलं होतं. दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्याचा झाप्पुक झुप्पुक नावाचा एक चित्रपट येत आहे. त्याचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटात सुरज चव्हाणसोबत अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत. या चित्रपटाची नेमकी कथा काय असेल? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र सुरजसोबत पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतील अभिनेते इंद्रनील कामत, हेमंत फरांदे अबीर गुलाल मालिकेतील पायली जाधव तसेच तुमची मुलगी काय करते मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे आदी दिग्गज कलाकार दिसणार आहेत. त्याच्या अगामी चित्रपटाची महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Suraj chavan new movie)