Nitish Kumar Reddy Powerful Century : बाॅक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवस गाजवत नितीश कुमार रेड्डीने झळकावले दमदार शतक, वाॅशिंग्टन सुंदरचे अर्धशतक भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात केल्या 358 धावा !
Nitish Kumar Reddy Powerful Century : ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारताने चौथ्या बाॅक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवशी कमाल केली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. अश्या वेळी नितीश कुमार रेड्डी व वाॅशिंग्टन सुंदर हे दोन अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाच्या मदतीला धावून आले. दोघांनी झुंजार खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले आणि भारताचा डाव सावरला. नितीशकुमार रेड्डीने दमदार शतक झळकावले तर वाॅशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले. भारताने पहिल्या डावांत ९ बाद ३५८ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नितीशकुमार रेड्डी १०५ धावांवर तर मोहम्मद सिराज २ धावांवर नाबाद खेळत होता.
