Bigg Boss Marathi Season 5 winner : गुलीगत धोका फेम सुरज चव्हाणने मारले बिग बाॅस मराठीचे मैदान, Suraj Chavan बनला बिग बाॅस मराठी सिजन 5 चा विजेता
मुंबई : ६ ऑक्टोबर २०२४ : Bigg Boss Marathi Season 5 winner Suraj Chavan : अभिनेता रितेश देशमुख होस्ट असलेल्या बिग बाॅस मराठीच्या पाचव्या सिजनचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर झापुक झुपूक फेम सुरज चव्हाण याने बिग बाॅस मराठीचे मैदान मारले. सुरज चव्हाण हा बिग बाॅस मराठीच्या पाचव्या सिजनचा विजेता बनला आहे.अतिशय गरिब कुटूंबातून पुढे आलेल्या सुरजने महाराष्ट्रातील मने जिंकत बिग बाॅसच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. सुरजवर अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे.

लोकप्रिय टीव्ही रियालिटी शो असलेल्या ‘बिग बाॅस मराठी ५’ चा ग्रँड फिनाले आज पार पडला. यंदाचा सिजन अनेक कारणांनी चर्चेत होता. सहा स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. टाॅप ६ स्पर्धकांमधून बारामतीच्या सुरज चव्हाणने बाजी मारली.अतिशय गरिब कुटूंबातून पुढे आलेल्या सुरज चव्हाणने इतिहास घडवला. गरिबाची पोरगं पण बाजी मारून शकतं हे त्याने सिध्द करून दाखवत महाराष्ट्रातील कोट्यावधी प्रेक्षकांची मने जिंकली.
बिग बाॅस मराठी ५ चा विजेता कोण ? विजेत्याला किती रक्कम मिळते?
बिग बाॅस मराठी ५ चा सुरज चव्हाण हा विजता बनला आहे. बिग बाॅस मराठीच्या विजेत्यासाठी २५ लाखाची रक्कम होती, परंतू बिग बाॅस च्या घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम घटवून ती ८ लाख करण्यात आली होती. मात्र पुन्हा ही रक्कम २५ लाख करण्यात आली. त्यानंतर ९ लाख रूपये घेऊन जान्हवी घराबाहेर पडली. बिग बाॅस मराठी ५ चा विजेता बनलेल्या सुरज चव्हाणला १४ लाख रूपयांचा चेक देण्यात आलाय. त्याचबरोबर एक इ स्कूटर, पु.ना.गाडगीळ यांच्याकडून एक लाख रूपयांचे दागिणे खरेदी करण्याचे व्हाऊचर देण्यात आले. सुरजवर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे.
कोण आहे सुरज चव्हण ?
अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याच्या गावी जाऊन त्याची समजूत काढली होती. सुरजने आपल्या साधेपणाने सगळ्यांचीच मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.