सुनंदाताईंच्या कौतुकाने भारावले चिमुकले संशोधक ! (Researchers were overwhelmed by Sunandatai’s appreciation)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड तालुक्याचे नाव देशपातळीवर गाजवणाऱ्या जवळा येथील तीन चिमुकल्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी आज जवळा येथे जाऊन त्या चिमुकल्यांची भेट घेतली. व त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. यावेळी या चिमुकल्यांना स्कुल बॅग, कंपास बॉक्स भेट देऊन सुनंदा पवार यांनी त्यांंचा सन्मान केला. यावेळी सुनंदाताईंनी केलेल्या कौतुकाने चिमुकले भारावून गेले होते. (Researchers were overwhelmed by Sunandatai’s appreciation ) जवळ्यातील चिमुकल्यांच्या यशाबद्दल कौतुक करणारी एक पोस्ट सुनंदाताई पवार यांनी शनिवारी रात्री फेसबुकवर शेअर केली आहे.

फेसबुकवर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमधून चिमुकल्यांचे कौतुक करताना सुनंदाताई पवार म्हणतात की, गावाकडची मुलं हुशार असतात असे नेहमीच म्हटले जाते आणि हे तितकेचं खरे आहे. जवळा येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय येथील सहावीच्या तीन मुलांनी जामखेडचे नाव अख्या देशात गाजवले. निमित्त होतं ते गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद मुंबई यांनी घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेचे. यात जवळा येथील शेख सुफियान जाकीर हुसेन, खाडे अथर्व बापू, सुळ साई संतराम या तीन मुलांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेत भारतातून तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी भारत भरातील 1950 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जात जवळा येथील या 3 मुलांचाही समावेश होता. नंबर पझल (अंक कोडे मॉडेल) या गणिती कोडे मॉडेल दाखवून त्यांनी परीक्षकांची मनं जिंकली या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. आज याच गुणवंत मुलांना भेटण्यासाठी मी खास जवळा येथे त्यांच्या शाळेवर भेट दिली तसेच मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मी त्यांना बॅग, कंपास बॉक्स भेट म्हणून दिले. या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक ही तितकेच महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांचा आदर सत्कार ही मी केला या मुलांना भेटून मला अत्यानंद झाला. जवळा येथील प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी देश पातळीवर पोहोचू शकले याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. यावेळी बोलताना मी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. (Researchers were overwhelmed by Sunandatai’s appreciation)

शेख सुफियान,खाडे अथर्व साई सुळ या चिमुकल्यांशी संवाद साधताना सुनंदाताई पवार