Maratha Reservations activists : मोठी बातमी : ठाकरे सरकारची मोठी घोषणा; मराठा अंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे

खासदार छत्रपती संभाजी महाराज व आमदार रोहित पवार यांनी मानले सरकारचे आभार (Maratha Reservations activists)

मुंबई : मराठा समाजाची एक महत्वाची मागणी राज्य सरकारने आज मान्य केली आहे. मराठा समाजाने हाती घेतलेल्या आरक्षणाच्या लढ्यात दाखल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याची घोषणा सरकारने केली आहे. (Maratha Reservations activists) सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. (Thackeray government’s big announcement; Behind all the crimes against the Maratha activists )

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात मोठी चळवळ उभारली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मुकमोर्चे काढले.आरक्षणासाठी काहींनी प्राणही गमावले. दरम्यान आरक्षणाचे अंदोलन काही काळ हिंसकही बनले होते. यामुळे अनेक अंदोलकांवर राज्यात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्याने केली जात होती. (Maratha Reservations activists)

खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही छत्रपती संभाजी महाराजांचे आभार मानले आहेत. (Maratha Reservations activists)

आमदार रोहित पवारांनी मानले सरकारचे आभार

कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राज्य सरकारने मराठा अंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.