- Advertisement -

jamkhed forest department | जामखेड वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याला मिळाले जीवदान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : जामखेड वनविभागाच्या सतर्कतेमुळे विहीरीत पडलेल्या एका कोल्ह्याला आज जीवदान मिळाले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील बोरले गावातून समोर आली आहे. (jamkhed forest department)

जामखेड तालुक्यातील बोरले गावातील शेतकरी महादेव येवले यांच्या शेतातील विहीरीत दोन दिवसांपुर्वी मादी जातीचा कोल्हा पडला होता. ही बाब येवले यांना काल सायंकाळी  निदर्शनास आली. त्यानंतर येवले यांनी जामखेड वनविभागाला (jamkhed forest department) विहीरीत कोल्हा पडल्याची माहिती कळवली होती.

आज जामखेड वनविभागाचे (jamkhed forest department) वनपाल अनिल खराडे, वनरक्षक किशोर गांगुर्डे, प्रविण उबाळे, किसन पवार , व वनकर्मचारी यांच्या टीमने बोरला गावातील महादेव येवले यांच्या विहीरीत पडलेला कोल्हा बाहेर काढण्याची कारवाई केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहीरीत उतरून अतिशय शिताफीने पाण्यात पडलेल्या कोल्ह्याला विहीरीबाहेर काढत जीवदान दिले.

कोल्ह्याला विहीरीतून बाहेर काढल्यानंतर निसर्गात मुक्त करण्यात आले.विहीरीतून बाहेर येताच कोल्ह्याने थेट ऊसात धुम ठोकली. सदर विहीरीत पडलेला कोल्हा मादी जातीचा होता अशी माहिती वनविभागाच्या (forest department) अधिकाऱ्यांनी दिली.

jamkhed forest department जामखेड वनविभागाने विहिरीतून असा बाहेर काढला कोल्हा .. पहा संपूर्ण व्हिडीओ