एक गाव – एक गणपती, पाटोद्यात पार पडली बैठक, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | यंदा होणाऱ्या गणेशोत्सवात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यासाठी जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने आज पाटोदा (गरडाचे) येथे शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

meeting was held in Patoda, one village - one Ganapati

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस नाईक बाळासाहेब तागड, पोलिस काँस्टेबल श्रीकांत शिंदे यांनी आज पाटोदा (गरडाचे) गावात एक गाव एक गणपती बाबत गावकऱ्यांची बैठक घेतली.यावेळी पाटोदा येथील गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

गावात कुठलाही सार्वजनिक उत्सव असो, सर्वधर्मीय लोक उत्सव तो उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आजवर हीच परंपरा जोपासण्यात आली आहे. प्रशासनाला नेहमीप्रमाणे सहकार्य करू असे मत माजी सरपंच समीर पठाण यांनी मांडले.

यावेळी पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी गावकऱ्यांच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस नाईक बाळासाहेब तागड, पोलिस काँस्टेबल श्रीकांत शिंदे यांचा सन्मान केला.

meeting was held in Patoda, one village - one Ganapati

यावेळी पाटोद्यात पार पडलेल्या बैठकीस सरपंच अशोक गव्हाणे, उपसरपंच वाहेद पठाण, माजी सरपंच समीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कवादे, दिनकर टापरे, विकास शिंदे, अशोक खाडे, कल्याण कवादे, पोलिस पाटील सरोजा शिंदे, चेअरमन अशोक महारनवर रज्जाक शेख, विजय शिंदे, मुकुंद आप्पा कडू, मच्छिंद्र लंघे, भाऊसाहेब कवादे, सुभाष सोनटक्के, दिलीप मोरे सर, बिभीषण कवादे, खंडूराजे कवादे, राजु शेख, नेवा महारनवर शहाजी महारनवर वैभव महारनवर शहाजी साळवे पिंटु कडु सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.