Khairi dam over flowed | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी । जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे खैरी धरण भरले !

खर्डा भागात आनंदोत्सव

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोमवारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे खैरी धरण आज शंभर टक्के भरले आहे अशी माहिती लघूपाटबंधारे विभागाचे उप अभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली.(Jamkhed taluka largest Khairi dam over flowed)

जामखेड तालुक्यातील खर्डा भागासाठी खैरी नदीवरील सातेफळ परिसरात खैरी मध्यम प्रकल्प आहे. खैरी धरण जामखेड तालुक्यातील एकमेव मोठे धरण आहे या धरणाची क्षमता 533. 60 द ल.घ.मी इतकी आहे. सोमवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी खैरी धरण ओव्हर फ्लो झाले. सध्या धरणाच्या सांडव्यातून बारिक धार वाहत आहेत.(Jamkhed taluka largest Khairi dam over flowed)

गेल्या आठवड्यात बालाघाटात कोसळलेल्या धो धो पावसामुळे नायगाव, मोहरी, तेलंगशी येथील तलाव भरले होता. याच तलावांच्या लाभक्षेत्रातून आलेल्या अतिरिक्त पाण्यातून खैरी धरण भरले. (Jamkhed taluka largest Khairi dam over flowed)

खैरी धरण भरल्याने खर्डा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या भागातील सिंचनाचा मोठा प्रश्न निकाली निघाला आहे. खैरी प्रकल्पाचा परिसर ग्रीन व्हॅली म्हणून ओळखला जातो. यंदाही ही ग्रीन व्हॅली हिरवीगार राहणार आहे. या भागात ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. खैरी धरण भरल्याचे समजताच अनेक गावातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.