Journalists Association | जामखेडमध्ये एकाच दिवशी दोन पत्रकार संघाच्या कार्यकारणी जाहीर, नासीर पठाण, दीपक देवमाने झाले अध्यक्ष !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Journalists Association | जामखेड तालुक्याच्या पत्रकारितेत रविवारचा दिवस मोठ्या घडामोडीचा ठरला. रविवारी जामखेड तालुक्यात दोन पत्रकार संघाच्या कार्यकारणी जाहीर झाल्या. जामखेडच्या सहारा हाॅटेलवर जामखेड तालुका पत्रकार संघाची तर झिक्रीत जामखेड तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक पार पडली. (In Jamkhed, on the same day, the executive committee of two journalists association was announced)

जामखेड पत्रकार संघाची आज दि. २६ रोजी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ पत्रकार पोपट गायकवाड, सुनील कोठारी, एस मार्टचे मालक संतोष फिरोदिया, अहमदनगर शहर बॅंकेचे संचालक संजय घुले, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश उगले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

जामखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण

जामखेडच्या सहारा हाॅटेलवर पार पडलेल्या बैठकीत जामखेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी जाहीर केली. यामध्ये जामखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण, उपाध्यक्षपदी अशोक निमोणकर तर सचिवपदी मिठुलाल नवलाखा सहसचिवपदी अविनाश बोधले तर खजिनदारपदी सुदाम वराट, कार्याध्यक्षपदी संतोष थोरात तसेच अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या सहचिटणीसपदी यासीन शेख यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

In Jamkhed on the same day the executive committee of two journalists association was announced

यावेळी अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून तालुक्यातील आठ  पत्रकारांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी मोहिद्दीन तांबोळी, समीर शेख, दत्तराज पवार, किशोर दुशी, नंदुसिंग परदेशी, राजेंद्र म्हेत्रे, ज्येष्ठ  पोपटराव गायकवाड, सुनील कोठारी,कायदेविषयक सल्लागार ॲड हर्षल डोके व ॲड अमोल जगताप, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे, गणेश जव्हेरी, बाळासाहेब वराट, अशोक वीर, राजेश भोगील, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, आसीफ सय्यद, धनराज पवार, संतोष गर्जे, अजय अवसरे, फारूक शेख, संतोष नवलाखा, पोपट गायकवाड, वामन डोंगरे, कैलास शर्मा, तुकाराम अंदुरे, जाकीर शेख, रियाज शेख, दादा जगताप, सत्तार शेख सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदुसिंग परदेशी तर आभार दत्तराज पवार यांनी मानले.

जामखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिपक देवमाने

जामखेड तालुका मराठी पत्रकार संघाचीही कार्यकारणी रविवारी जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाची बैठक झिक्रीत पार पडली. काही दिवसांपूर्वी जेष्ठ पत्रकार शिवाजीराव इकडे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु रविवारी नियमित अध्यक्ष निवडीची बैठक पार पडली.

या बैठकीत दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी दिपक देवमाने यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांची निवड करण्यात आली. ही बैठक मावळते हंगामी अध्यक्ष शिवाजीराव इकडे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली.

In Jamkhed on the same day the executive committee of two journalists association was announced

यावेळी जेष्ठ पत्रकार वसंत सानप, प्रकाश खंडागळे,लियाकत शेख,संजय वारभोग, डाॅ धनंजय जवळेकर, विजय राजकर,सचिन आटकरे अविनाश ढवळे, अक्षय ठाकरे, शंकर कुचेकर, मनोज कोळपकर, रामहरी रोडे. तानाजी पवार सह आदी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

दोन्ही पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जामखेड तालुका डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना व जामखेड टाईम्सच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

 

web tital : journalists association | In Jamkhed on the same day the executive committee of two journalists association was announced