धक्कादायक :रोहित पवारांच्या मतदारसंघातून भेसळयुक्त दुधाचा पुरवठा थेट बारामतीत ! (Shocking: Supply of adulterated milk directly from Rohit Pawar’s constituency to Baramati!)

दुध भेसळीचा गोरखधंदा तेजीत;या धंद्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तारशेख ): आमदार रोहित पवारांच्या कर्जत – जामखेड मतदारसंघातील (Rohit Pawar’s constituency ) जामखेड तालुक्यात दुध भेसळीचा गोरखधंदा तेजीत आहे. या धंद्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून दुध भेसळीचे एक प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणातील भेसळयुक्त दुधाचा पुरवठा थेट बारामतीत होत असल्याचे समोर आले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दुध संकलन केंद्रातील तब्बल  ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध बारामतीत जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने केली आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.(Shocking: Supply of adulterated milk directly from Rohit Pawar’s constituency to Baramati)

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. तब्बल २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने जप्त करण्याची कारवाई केली आहे. संबंधित दुध संकलन केंद्र हे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथून एम.एच ११/ए.एल ५९६२) या टँकरमधून सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती अन्न व औषधप्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अर्जून भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकत  कारवाई केली. टँकरचालक संपत भगवान ननावरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवकृपा दूध संकलन केंद्राचे दुध असल्याचे सांगितले. पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दर्जाचे दुध असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी ताब्यात घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा दुधाचा साठा जप्त करत बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर नष्ट करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे.(Shocking: Supply of adulterated milk directly from Rohit Pawar’s constituency to Baramati)

पशुधन कमी असतानाही दुध पुरवठा जास्त कसा ?

जामखेड तालुक्यात दुध भेसळीचे रॅकेट मोठे आहे. या काळ्याधंदात अनेक पक्षांचे राजकीय कार्यकर्ते सहभागी आहे. तालुक्यातील पशुधनाची संख्या अन त्यातून उत्पादित होणारे दुध अन तालुक्यातून जाणारे दुध यात मोठी तफावत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघात सुरू असलेला दुध भेसळीचा गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. जामखेड तालुक्यात भेसळयुक्त दुधावर जगणारे काळे बोके कधी गजाआड होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

राजकीय पक्षाचा पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्याचे दुधसंकलन केंद्र

बारामतीला पुरवठा झालेले भेसळयुक्त दुध हे खर्ड्यातील शिवकृपा दुध संकलन केंद्राचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर केंद्र हे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी तथा खर्डा ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असलेल्या राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीचे आहे. राजकीय पक्षाचा पदाधिकारी दुध भेसळीच्या काळ्या धंदात सहभागी होऊन नागरिकांच्या जीवाची जीवघेणा खेळ खेळत असल्याचे पुढे आले आहे. आता संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई होणे आता आवश्यक आहे. काय कठोर कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.