Corona started the week strongly | कोरोनाने आठवड्याची सुरूवात केली दणक्यात !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाने आठवड्याची सुरूवात दणक्यात केली आहे. सोमवारी कोरोनाचा वेग वाढला आहे. जामखेड शहरात सोमवारी सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. (Corona started the week strongly)

जामखेड तालुका आरोग्य विभागाने सोमवारी दिवसभरात एकुण ५५२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यात सर्वाधिक ०४ रूग्ण हळगावमध्ये तर धोतरीमध्ये ०१ असे ०५ रूग्ण आढळून आले आहेत. (Corona started the week strongly)

तर RTPCR अहवालात जामखेड ०९, मुंजेवाडी ०१, नान्नज ०४, जामवाडी ०१, बांधखडक ०४, खर्डा ०३, तेलंगशी ०१, डोणगाव ०२, खामगाव ०१, पाटोदा ०२, नाहूली ०१, जवळके ०२, शिऊर ०१, पिंपळगाव उंडा ०१, असे ३३ तर इतर तालुक्यातील ०२ असे एकुण ३५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. (Corona started the week strongly)

सोमवारी दिवसभरात रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ०५ तर RTPCR अहवालात ३३ असे एकुण ३८ नवे कोरोनाबाधित जामखेड तालुक्यात आढळून आले आहेत.  दिवसभरात एकुण ५०७ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने ताब्यात घेऊन कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (Corona started the week strongly)