corona update jamkhed news : वाचा – मंगळवारी कुठल्या गावात किती रूग्ण ?

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : corona update jamkhed news | जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर कायम आहे. सोमवारी कोरोनाचा उद्रेक झाला होता. परंतु मंगळवारी कोरोनाच्या रूग्ण संख्येत काहीशी घट झाली आहे.

मंगळवारी जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात ६५३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यामध्ये डोणगाव ०२, भवरवाडी ०१ व इतर तालुका ०१ असे ०४ रूग्ण आढळून आले आहेत.

तर RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०२, जवळा ०१, मुंगेवाडी ०१, नाहुली ०३, पाडळी ०१, नान्नज ०१, धामणगाव ०१ असे १० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. (corona update jamkhed news )

मंगळवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण १४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने मंगळवारी ४३९ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीकरिता अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.