corona patients in ahmednagar district today | कोरोना सुसाट 91: बुधवारी कोरोनाने दिला पुन्हा मोठा दणका !

बुधवारी जामखेड तालुक्यात दिवसभरात आढळून आले ९१ रुग्ण

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. विशेषता: ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक आहे. जामखेड तालुका आता कोणत्याही क्षणी रेड झोनमध्ये जाऊ शकतो अशी चिन्हे दिसु लागली आहेत. बुधवारी जामखेड तालुक्यात कोरोनाचे शतक झळकावल्यात जमा आहे.(corona patients in ahmednagar district today)

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रादुर्भाव मोठा संकटाची तर नांदी ठरणार नाही ना ? ही चिंता आता जनतेला सतावू लागली आहे. बुधवारी जामखेड शहर, रत्नापुर व जवळा या गावांमधील रूग्णांची संख्या अधिक आहे. रूग्णवाढीसाठी आता धार्मिक कार्यक्रम तर पोषक ठरत नाहीत ना ? याचा विचार करण्याची वेळ सर्वच समाज घटकांवर येऊन ठेपली आहे. रूग्ण संख्या अशीच वाढत गेली तर तालुका पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ढकलला जाईल असेच आता बोलले जात आहे.(corona patients in ahmednagar district today)

बुधवार दि २८ जुलै रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात ७७१ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४३२ नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.(corona patients in ahmednagar district today)

बुधवारी करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमधून पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये जामखेड ०३, वाघा ०४, रत्नापुर ०३, शिऊर ०२, मोहा ०३, तेलंगशी ०३, जवळा ०१‌ अश्या १९ नव्या रूग्णांचा समावेश आहे.(corona patients in ahmednagar district today)

तर RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड ०९, कवडगाव ०१, फक्राबाद ०३, वंजारवाडी ०३, खर्डा ०७, भोगलवाडी ०६, तेलंगशी ०२, रत्नापुर १३, नान्नज ०१, पिंपळगाव उंडा ०१, जवळा ०९, जमदारवाडी ०१, पाडळी ०२, चुंबळी ०१, आघी ०२, डोणगाव ०१, साकत ०१, आनंदवाडी ०१, बोरला ०५, शिऊर ०२, जवळके ०१, असे ७२ तर इतर तालुक्यातील ०७ अश्या ७९ रूग्णांचा समावेश आहे. त्यानुसार बुधवारी दिवसभरात ९१ रुग्ण आढळून आले आहेत. आता जामखेडकरांच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.(corona patients in ahmednagar district today)