sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | धक्कादायक : वाळूतस्करांनेच लावला थेट प्रांताधिकाऱ्यांना चुना !

एक लाखाची लाच स्विकारताना महिला प्रांताधिकारी अडकल्या लाचलुचपतच्या जाळ्यात

sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  वाळूतस्करांकडून (Sand smuggler) हप्ता घेताना महसुल विभागातील (Revenue Department) कुणी बडा अधिकारी आजवर लाचलुचपत विभागाकडून (anti-corruption Department) कधी पकडला गेला नाही पण आता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात महसुल विभागाचा एक बडा मासा अडकल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे लाचलुचपतने ही कारवाई थेट प्रांत अधिकाऱ्यांवर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. (sub divisional magistrate arrested in anti-corruption operation)

sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | वाळू तस्करांकडून (Sand smuggler) लाखो रूपयांचे हप्ते उकळून स्वता:चे उखळ पांढरे करणारे महसुल विभागात (Revenue Department) ढिगाने भरले आहेत. वाळू तस्करीला अभय देऊन लाखोंची माया जमवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर अंकुश कोण लावणार ? हा सवाल सातत्याने चर्चेत असतो. परंतु  कोतवाल ते बडा महसुल अधिकारी वाळूवर जोमाने चरतात हे जगजाहीर आहे. अश्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी थेट वाळूतस्करानेच (Sand smuggler) पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे.चोरावर मोर म्हणतात ना असेच हे प्रकरण आता उस्मानाबाद जिल्ह्यातून समोर आले आहे. (Anti-corruption action: sub divisional magistrate Manisha Rashinkar caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh)

Sub-divisional officer arrested in anti-corruption operation | उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील (Jaktewadi in Paranda taluka of Osmanabad district) एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास (Sand smuggler) वाळूचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी प्रांताधिकारी मनिषा राशिनकर (sub divisional magistrate Manisha Rashinkar)यांनी ०१ लाख १० हजार रूपये दरमहा लाच मागितली होती. ही लाच घेताना प्रांताधिकारी (sub divisional magistrate) व कोतवाल यांना मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | या प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर (Bhum sub divisional magistrate Manisha Rashinkar) यांच्यासह विलास नरसिंग जानकर या कोतवालास ०१ लाख १० हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Anti-corruption action: Sub-divisional officer Manisha Rashinkar caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh)

sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ०१ लाख १० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार आरोपी कोतवाल जानकर याच्या हस्ते स्वीकारल्याचे समोर आले आहे. तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी प्रांताधिकारी (sub divisional magistrate) मनिषा राशिनकर व कोतवाल जानकर यांनी लाच घेतली. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात (Bhum police station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती.सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद यांनी ही कारवाई केली. (Anti-corruption action: Sub-divisional officer Manisha Rashinkar caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh)

sub divisional magistrate arrested in anti-corruption operation | महसुल विभागातील उच्चपदस्थ महिला अधिकारी थेट लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान प्रांत अधिकाऱ्यांवर लाचलुचपतची कारवाई घडवून आणणारा तो वाळू तस्कर कोण याचीच चर्चा आता राज्यात रंगली आहे. (Anti-corruption action: Sub-divisional officer Manisha Rashinkar caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh)

web title: Sub-divisional officer caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh, Anti-corruption action, Bhum police station, Bhum Sub-Divisional Officer Manisha Rashinkar, Sand smuggler, Anti-corruption raid on sub-divisional officers while accepting bribe from sand smugglers, Jaktewadi in Paranda taluka of Osmanabad district, bhum Revenue Department, sub divisional magistrate Manisha Rashinkar caught red-handed accepting bribe of Rs 1 lakh, Anti-corruption action,