...

क्या बात है ! घरबसल्या ‘क्यूआरकोड’ द्वारे मिळणार महसूली अर्धन्यायीक निकाल, मंडळाधिकारी डाॅ मोहसीन शेख यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची महाराष्ट्रात चर्चा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा। महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. मंडळ अधिकारी डॉ.मोहसीन शेख यांनी ही कल्पक संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून राज्यातील महसूल विभागासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे.

Semi-judicial revenue results will be available through QR code at home, Board Officer Dr. Mohsin Shaikh's innovative activities discussed in maharashtra

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकांने ‘क्यूआर कोड’चा वापर प्रथम पाठ्यपुस्तकांमध्ये केला. या कल्पकतेची शासनाने दखल घेत सर्वच पाठ्यपुस्तकांमध्ये ‘क्यूआर कोड’ वापरण्यास सुरूवात केली. अशाच प्रकारची कल्पकता व नावीन्यता डॉ.मोहसिन शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली आहे.

Semi-judicial revenue results will be available through QR code at home, Board Officer Dr. Mohsin Shaikh's innovative activities discussed in maharashtra

महसूल विभागामार्फ़त विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात व सदर आदेश  https://eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट व त्यावरील स्कॅनसाठी कमी साईजचे असलेले बंधन यामुळे निकालपत्र तितके स्पष्ट दिसत नाही.

अर्जदार सामनेवाले यांना केवळ निकालाची समज देणेबाबत कायद्यात व शासन निर्णयात तरतूद असल्याने निकालाची समज देताना त्या पानावर हे ‘क्यूआर कोड’ असणार आहे. त्यामुळे सहजासहजी हे निकालपत्र स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे. तसेच निकालपत्र हे डिजिटल सहीचे असल्याने पुन्हा नक्कल काढण्याची आवश्यकता नाही.यामुळे अर्जदार, सामनेवाले, हितसंबंधित व्यक्ती व विधिज्ञ यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शासकीय कामात अधिक पारदर्शकता येऊन तत्परता येणार आहे. अशी माहिती मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी दिली.

‘‘भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या कलम ८५ सी व ६५ अन्वये  व माहिती तंत्रज्ञान कायदा २००२ च्या कलम ४ अन्वये  डिजिटल स्वाक्षरी असलेला अभिलेख पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळे वेगळी प्रमाणित प्रत मागण्याची आवश्यकता नाही. अशी प्रत पुरावा कायद्याच्या कलम ७६ अन्वयेही प्रमाणित प्रत म्हणून ग्राह्य धरतात. या उपक्रमामुळे निकालाची प्रत सहज व सुस्पष्ट उपलब्ध होत आहे. वापर करण्याची पद्धत ही अंत्यंत  साधी व सोपी आहे.’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे.

‘क्यूआर कोड’ चा वापर कसा करावा ?

मोबाईलमध्ये प्लेस्टोर किंवा ॲपस्टोर मधून ‘क्यूआर कोड’ स्कॅन ॲप डाऊनलोड करून घ्यावे व अँप मधील स्कॅन पर्याय वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन करावा. त्यांनतर ओपन वेबसाईट वर क्लिक केल्यास डिजिटल सहीचा संपूर्ण निकाल आपणाला मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात प्राप्त होईल. आपण त्याची प्रिंट काढू शकता व तो निकाल इतरांना पाठवू ही शकता.

Semi-judicial revenue results will be available through QR code at home, Board Officer Dr. Mohsin Shaikh's innovative activities discussed in maharashtra