Sanjay Raut big reaction on Nitesh Rane case | नितेश राणेंना पाताळातून शोधून काढू  – आक्रमक झालेल्या संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut big reaction on Nitesh Rane case | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ठाकरे विरूध्द राणे (Thackeray vs Rane) हा संघर्ष राज्यात शिगेला पोहचला आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) घडलेल्या एका हल्ल्यात आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचे नाव आल्याने राणेंच्या अटकेसाठी पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. कणकवली कोर्टात (Kankavali court) अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू आहे. यावर कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena MP Sanjay Raut big reaction ) यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश राणे पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावा बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना केला आहे. एकीकडे सिंधुदुर्ग न्यायालयात (Sindhudurg Court) नीतेश यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली.

संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांने लपवले असेल तर…असे सूचक विधानही त्यांनी नीतेश यांचे नाव न घेता केले. मात्र, यावर जास्त विचारणा केली असता, मी आताचं बोलत नाहीय. काही सांगता येत नाही ना, म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पोलीस भरती गैरव्यवहाराची कागदपत्रे माझ्याकडे आली होती. ती मी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, असेही राऊत म्हणाले. राज्य सरकार बरखास्त नाही केले, तर नाव बदलू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. या वाक्याच्या संदर्भ घेत राऊत म्हणाले की, त्यांना नाव बदलावेच लागेल. मला त्यांचे नाव आवडते. मात्र, त्यांच्यासाठी नाव बदलण्याची व्यवस्था करू. बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का, राष्ट्रपती तुमच्या घरी चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहे का, त्यांचा स्टाफ आणून ठेवलाय का, असा सवाल त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, मी राज्यपाल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो. ते महाराष्ट्रात आले नव्हते, तेव्हापासून त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. राज्यपालांना कोण धमकी देणार? उद्धव ठाकरेंची धमकी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्रात घेतो आहे. हा साधा सरळ विषय आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून भ्रम निर्माण झाला. राज्यपालांनी कळवलं. आम्ही मान्य केलं. ते अत्यंत सभ्य गृहस्थ, सुस्वभावी आहेत, असा उल्लेखही त्यांनी केला.