कब तक छिपोंगे गोहाती में, आना ही पडेंगा …चौपाटी में

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाचा आजचा सहावा दिवस आहे. बंडखोर गटातील अनेक जण पुन्हा शिवसेनेत परततील, असा दावा खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांच्याकडून केला जात आहे. अश्यातच राऊत यांचे एक ट्विट आता चर्चेत आलं आहे.

काय ती झाडी…काय ते डोंगर…काय ती हाटील.. एकदम ओक्केच..असं म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील ( mla Shahaji Patil Sangola) यांनी सोशल मीडियावर एकच धुरळा उडवून दिला आहे. शहाजी पाटील यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.त्यांच्याच वक्तव्याचा धागा पकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन | Eknath Shinde’s emotional appeal to Shiv Sainiks

कब तक छिपोंगे गोहाती में..आना ही पडेंगा.. चौपाटी में..’ असं म्हणत संजय राऊत यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Jirwal) यांचा फोटो ट्वीट केला आहे. झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांना मान्यता दिली आहे. पण, एकनाथ शिंदे यांनीही भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचा दावा केला आहे.

सामाजिक न्याय दिन महत्त्व व इतिहास : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

पण, झिरवळ यांनी शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे शिंदेंची पिछेहाट झाली आहे.एवढंच नाहीतर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकणार असा विश्वास व्यक्त करून शिंदेंच्या बंडखोर गटाला मुंबई येण्याचे आव्हान राऊत यांनी केले आहे. या सगळ्या प्रकरणात उपाध्यक्ष झिरवळ यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांवर सामनातून (Saamana Editorial) निशाणा साधला आहे. चार्टर्ड विमाने, गाडय़ा, हॉटेल्स यावर अमर्याद खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे तरी होतील काय?

शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकडय़ांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या श्री. शिंदे यांना सोडूनही पळ काढतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी वारंवार बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले आहे. आताही राऊत यांनी ‘कब तक छिपोंगे गोहाती में..’ असं म्हणत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.