मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल करा : शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । प्रक्षाेभक वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केली आहे.

शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीचा आजचा सातवा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political crisis) सुप्रीम कोर्टात गेला आहे. कोर्टाचा निर्णय 11 जुलै नंतर येणार आहे. त्याआधी राज्यात रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

गुवाहटी येथे असलेल्या सेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या विराेधात राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसैनिक एकनाथ शिंदे (eknath shinde live updates) यांच्या गटाच्या विराेधात माेर्चे काढत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत हे विविध ठिकाणी मेळावे घेत शिवसैनिकांचे बळ वाढवत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या विराेधात आक्रमक व्हा असेही मान्यरांकडून आदेश दिले जात आहेत.

या सर्व पार्श्वभुमीवर मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच तिघांना पत्रकार परिषद घेण्यापासून राेखावे असे याचिकेत नमूद केले आहे. (File charges against Shiv Sena leaders including CM uddhav thackery , Shinde group’s petition in Mumbai High Court)