Namdev Raut | नामदेव राऊतांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला पण राजकीय पुनर्वसन कसे होणार ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | Namdev Raut joined NCP | कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat – Jamkhed Constituency) पक्षांतराचे वारे वेगवान झाले आहे.मागील 25 वर्षांपासून मजबुत असलेल्या भाजपच्या (BJP) गडाला आता सुरूंग लागू लागला आहे. विधानसभेतील भाजपच्या पराभवानंतर भाजपातील अनेक नेते भाजपला ‘राम राम’ ठोकत राष्ट्रवादीत (NCP) दाखल होऊ लागले आहेत.भाजपचा गड आता ढासळू लागला आहे. दोन वर्षात ही परिस्थिती बदलली आहे.

कर्जत भाजपचे नेते नामदेव देवा राऊत (Namdev Raut) यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याआधी प्रसाद ढोकरीकर (Prasad dhokarikar) व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.राष्ट्रवादीत सुरू झालेले इनकमिंग मोहिमेने पक्षात चैतन्य पसरले आहे.परंतु राष्ट्रवादीत दाखल होणाऱ्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार हा खरा प्रश्न आहे. (Namdev Raut joined NCP but how will political rehabilitation take place?)

भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले नामदेव देवा राऊत हे बंडखोर प्रवृत्तीचे ‘महत्वाकांक्षी’ नेते आहेत. त्यांच्या मागे ‘माळी’ समाजाची ‘वोटबँक’ आहे. दोन्ही तालुक्यात राऊत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राऊत यांच्या राजकीय ताकदीचा राष्ट्रवादीला निश्चितच फायदा होईल. परंतु राऊत यांचे विधानसभेचे आमदार होण्याचे स्वप्न राष्ट्रवादीत आता पुर्ण होऊ शकणार नाही. राऊत यांनी आमदारकीसाठी अनेकदा दंड थोपटले आहेत.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकीच्या स्वप्नावर पाणी तर सोडले नाही ना ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

परंतु, मोठी राजकीय ताकद असलेल्या नामदेव राऊत यांच्या रूपाने राष्ट्रवादीला मोठा नेता मिळाला आहे. प्रथमदर्शन कुठल्याही अटीविना राऊत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु राऊत यांना मानाचे स्थान देणे राष्ट्रवादीला भाग आहे. राष्ट्रवादी राऊत यांचे राजकीय पुनर्वसन कोणत्या माध्यमांतून करणार हा खरा प्रश्न आहे. राऊत नगरपरिषदेच्या सत्तेवर समाधान मानणार का ? कि, मोठी संधी देऊन राष्ट्रवादी राऊतांचे पुनर्वसन करणार ?याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादीत आधीच दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचा भरणा अधिक आहे. त्यातील बहुतांश नेते कार्यकर्ते राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.त्यात नव्याने पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांमुळे राजकीय पुनर्वसनाची स्पर्धा वाढणार आहे. पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदलू लागले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणात जुन्या-नव्यांचा राजकीय ताळमेळ पक्षाला अर्थात आमदार रोहित पवारांना बसवावा लागेल. राजकीय पुनर्वसन करतानाही रोहित पवारांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागेल असेच चित्र आहे.

अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकहाती जिंकण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीकडून राबवली जात आहे. भाजप विरूध्द राष्ट्रवादी या संघर्षांत सध्या तरी राष्ट्रवादी वरचढ दिसत आहे.

भाजपचा बालेकिल्ला ढासळत असताना माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना स्वता:ची यंत्रणा उभी करून पक्षाला मजबुती देण्याशिवाय पर्याय नाही. ‘अडचणीत’ सापडलेल्या कार्यकर्त्यांना राम शिंदेंना ताकद द्यावीच लागेल, तरच भाजपातून सुरू झालेले आऊटगोईंगचे सत्र थांबेल अन्यथा पुढे जे काही होईल ते सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.

 

सत्तार शेख, संपादक
जामखेड टाईम्स, 9960105007

 

web title: Namdev Raut joined NCP but how will political rehabilitation take place?