चोंडीच्या सीना नदीवर होणार 4 कोटींचा भव्य घाट,राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : आमदार रोहित (दादा) पवार यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील चोंडी येथील सीना नदीवर उभारण्यात येणाऱ्या नदी घाटाचे भूमिपूजन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

आमदार रोहित दादा पवार यांच्या पुढाकारातून चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाशेजारील सीना काठावर सुमारे चार कोटी वीस लाख रुपये खर्चून भव्य अश्या नदी घाटाचे निर्माण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज चोंडी येथे करण्यात आला.

दरम्यान पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे चोंडी येथे दुपारी चारच्या सुमारास आगमन झाले. यावेळी तटकरे यांच्यासोबत आमदार रोहित पवार, आमदार यशवंत (तात्या) माने, आमदार राजू नवगिरे उपस्थित होते.यावेळी तटकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टीची पाहणी केली.

त्यानंतर अहिल्यादेवी होळकर स्मारका शेजारी असलेल्या सीना नदीची पाहणी केली. त्यानंतर सीना नदीवर उभारण्यात येणाऱ्या नदी घाटाच्या कामाचे भूमिपूजन केले. चोंडी सुरु असलेल्या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द यावेळी तटकरे यांनी बोलताना दिला.

यावेळी चोंडी विकास प्रकल्पाचे शिल्पकार माजी मंत्री आण्णा डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात, चोंडीच्या सरपंच आशाताई सुनिल उबाळे, वैजनाथ पोले, सुंदरदास बिरंगळ,  कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सहाय्यक अभियंता अमित निमकर , संजय कांबळे, अक्षय शिंदे, विश्वनाथ राऊत, संतोष निगुडे, तहसीलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, अमर चाऊस, शरद ढवळे, सह आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री आदिती तटकरेंनी दिली चोंडीला भेट, नदी घाटाच्या कामाचे केले भूमिपूजन… पहा संपूर्ण कार्यक्रम